मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरली. आणि त्यामुळेच टीम B ला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही असे बिग बॉस यांनी जाहीर केले. काल साप्ताहिक कार्यामध्ये पणाला लागले बाथरूम आज बघूया कोण या उपकार्यामध्ये विजयी ठरेल. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अजून एक उपकार्य रंगणार आहे “ फळ की निष्फळ” यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळं. या उपकार्यातील विजयी टीममधील सदस्यांना घरातील फळं खाण्याची परवानगी असेल. बघूया या कार्यात कोण बाजी मारणार? टीम A की टीमB.
आज विशाल विकासची माफी मागणार आहे. विशाल विकासला टास्कमध्ये काहीतरी बोलून गेला असावा त्यामुळे विकासला विशाल आपल्या मनातील गोष्ट सांगणार आहे. विशाल म्हणाला, “ टास्क संपला भावा, टास्कच विषय तिथेच सोड. तुला माहिती आहे मी कसा खेळतो आणि मला माहिती आहे तू कसं खेळतोस. हा गेम इथे संपला विषय इथे सुटला. आणि शेवटी दरवाजा बंद करून आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेव. आणि जे काही मी तुला रागाने बोललो असेल मला बोलण्याची इच्छा नव्हती मी माफी मागतो. हा गेम आहे. तू खूप भारी खेळतोस. तू इन्सपिरेशन आहेस माझं आणि मनात काही राग ठेऊ नकोस”. असं काय घडलं खेळात की विशालने विकासची माफी मागितली? काय बोलून गेला विशाल विकासला ज्याचं त्याला इतकं वाईट वाटलं आहे? विकास विशालला माफ करेल? कोणती टीम जिंकेल आजची उपकार्ये?
अक्षय वाघमारे illegal संचालक?
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादविवाद होताना दिसत असतात. हे सदस्य कधीकधी ही भांडण, मतभेद विसरून एकमेकांना साथ देताना देखील दिसतात. बिग बॉस मराठीचं हे घर प्रत्येक सदस्याला त्याची नव्याने ओळख करून देत असं म्हणायला हरकत नाही. बिग बॉस जेव्हा सदस्यांना एखादा टास्क देतात तेव्हा त्या टास्कचा एक संचालक देखील नेमून देतात. कधी हा संचालक fair आहे असं म्हणतात तर कधी dirty आहे असं म्हणतात.
आजच्या भागामध्ये विकास अक्षयवर थोडा नाराज दिसणार आहे. आज होणार्या टास्कचा अक्षय संचालक आहे. अक्षयने असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे विकास त्याच्यावर इतका नाराज झाला आहे. कळेलच आजच्या भागामध्ये. विकास आणि मीनलमध्ये आजच्या भागामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. मीनल विकासला सांगणार आहे “ तू कितीही जीव तोड, काहीपण कर dirty होणार आहे. काही फायदा नाहीये यांच्यावर एनर्जि घालवून. तू तुझा मुद्दा मांड जो पण आहे, शेवटी तेच होणार आहे जे त्यांना हवं आहे. त्यामुळे स्वतला त्रास करून नको घेऊस. विकास म्हणाला, “ अक्षय काय कामाचा आहे. कशाला त्याला संचालक केलं आहे. आपण fair खेळू आणि हारू”. नक्की मीनल आणि विकास काय बोलत आहेत? कळेल आजच्या भागामध्ये. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री९.३० वा. कलर्स मराठीवर.