अखेर आज पहाटे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर पृथ्वीवर परतणार

LIVE व्हिडीओ बघा 

0

मुंबई ,दि, १८ मार्च २०२५ – गेल्या नऊ महिन्यापासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मुहूर्त अखेर ठरला असून ते भारतीय प्रमाणवेळे नुसार बुधवारी पहाटे ३ वाजून ५७ मिनिटाने  पृथ्वीवर परत येतील. आठ दिवसांच्या छोट्या मोहिमेवर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा साथीदार बुच विल्मोर यांना जवळपास नऊ महिने अंतराळात घालवावे लागले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे पुन्हा पृथ्वीवर येणं पुढं ढकललं जात होते. पण,आता अखेर १८ मार्चला त्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परतणार आहेत.

सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केले.

दरम्यान नासाच्या बोईंग स्टारलाइनर चाचणी उड्डाणाचा भाग असलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळयानातील तांत्रिक समस्यांमुळे परत येण्यास अनेक महिने विलंब झाला आहे. नासाने अलीकडेच एका मदत मोहिमेला मान्यता दिली आणि शुक्रवारी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून संध्याकाळी ७:०३ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ४:३३) ड्रॅगन अंतराळयानाला घेऊन जाणारे स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. ड्रॅगन सकाळी १० वाजता आयएसएसवर पोहोचले.रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १० व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोडविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.

‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ‘स्पेस एक्स ड्रॅगन क्रू’ या अंतराळयानाचे ‘हॅच’ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

LIVE व्हिडीओ बघा 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!