स्वानंद बेदरकर यांच्या कवितासंग्रहाचे १ ऑगस्ट रोजी प्रकाशन :कवी सौमित्र यांची विशेष उपस्थिती

0

📍 नाशिक, ३१ जुलै २०२५ Swarnand Bedarkar poetry collection प्रसिद्ध वक्ते, साहित्य संपादकमराठी साहित्याचे अभ्यासक स्वानंद बेदरकर यांच्या ‘पावसाच्या गर्भतळी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन नाशिकमध्येऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता कुसुमाग्रज स्मारक येथील ‘विशाखा’ सभागृहात पार पडणार आहे.

या विशेष प्रकाशन सोहळ्यास मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेमा क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा कवी व अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांची खास उपस्थिती लाभणार आहे. या कवितासंग्रहावर आधीच राज्यभर चर्चा रंगली असून पावसाच्या विविध भावना आणि छटा या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त करण्यात आल्या आहेत.

पुण्यानंतर आता नाशिकमधील प्रकाशन सोहळा(Swarnand Bedarkar poetry collection)

या कवितासंग्रहाचे याआधी पुण्यात प्रकाशन झाले होते. मात्र नाशिककरांच्या विशेष मागणीमुळे आणि साहित्यवेड्या शहराच्या भूमिकेला मान देत ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या वतीने हा प्रकाशन समारंभ कौतुक सोहळा म्हणून आयोजीत करण्यात आला आहे.

कवितांच्या वाचनातून आणि सादरीकरणातून रसिकांना एक आगळीवेगळी अनुभूती देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. विशेष म्हणजे स्वानंद बेदरकर यांच्या कवितांतून पाऊस या विषयाचे विविध मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक स्तरांवरील दर्शन घडवले गेले आहे.

सौमित्र यांची उपस्थिती ठरणार आकर्षण

कवी सौमित्र हे स्वतःही पावसावर कवितांमधून बोलणारे साहित्यिक आहेत. त्यामुळे पावसाच्या गर्भतळी या संकलनाच्या प्रकाशनास त्यांची उपस्थिती एक प्रकारे काव्य आणि पावसाचा एकत्र संगम ठरणार आहे.

नाशिकच्या भूमीतून मराठी साहित्यास नवा झळाळी

स्वानंद बेदरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांचे लेखन प्रगल्भ असून, या संग्रहात त्यांनी पावसाच्या रूपकांतून मानवी मनाचे आणि समाजातील बदलांचे भान दाखवले आहे. त्यामुळे हा संग्रह केवळ निसर्गकवितांचा संग्रह नसून तो भावभावनांचा संवेदनशील दस्तऐवज ठरतो.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, “नाशिककर रसिकांनी साहित्याच्या या श्रावणमयी उत्सवात सहभागी व्हावे आणि बेदरकर यांच्या साहित्यप्रवासाला साक्षी राहावे.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!