काबुलमध्ये पाकविरोधात काढलेल्या रॅलीवर तालिबान्यांचा गोळीबार

0

काबुल – अफगाणिस्तान ची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानविरोधात निदर्शनं करणाऱ्यां नागरिकांनावर तालिबान्यांनी गोळीबार केला. यात अनेक महिला आणि मुलंही जखमी झाल्याचं वृत्त आहे.अफगाणिस्तानमधील घडामोडींमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. या आंदोलनकांना पांगवण्यासाठी तालिबान्यांकडून गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तान, ISI तालिबान्यांच्या बरोबरीने लढाईत उतरले आहेत. त्यामुळे आता अफगाणी नागरिकांमध्ये पाकविरोधात असंतोष वाढला आहे.रॅलीमधील जवळपास ७० लोक पाकिस्तानी दुतावासाबाहेर आंदोलन करत होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. हातात बॅनर घेत यावेळी इस्लामाबाद आणि आयएसआयने अफगाणिस्तानात हस्तक्षेप करत असल्याच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. आंदोलन चिघळत असल्याचं पाहून आंदोलकांना तेथून पांगवण्यासाठी तालिब्यान्यांनी गोळीबार केला.

AFP च्या वृत्तानुसार काबुलमध्ये मंगळवारी पाकिस्तानविरोधी आंदोलनादरम्यान गोळीबार झाला. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलं जखमी झाल्याचं या न्यूज एजन्सीने म्हटलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.