मुंबई – राज्यातील कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही राज्यसरकार तर्फे घेण्यात आला आहे. म्हणूनच आता येतं शैक्षणिक वर्ष २ नोव्हेंबर सुरु होईल अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
त्यानुसार आताशैक्षणिक वर्ष २ नोव्हेंबर सुरु होणार असल्याने राज्यातील महाविद्यालये दिवाळी नंतर म्हणजे नोहेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होतील अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत.मात्र,राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी महाविद्यालये सुरु होतील असं नाही. तर त्या त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाणार आहे.
महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय जरी घेण्यात आला असला तरी राज्यातील सर्व महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण झालं असणं देखील महत्त्वाचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे.त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले