मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या टीसीएल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने फ्लिपकार्टवर वॉशिंग मशीन्सचे नवीन मॉडेल लाँच केले आहे.नव्या तंत्रज्ञानावर आधारित हे वॉशिंग मशीन ग्राहकांना समाधान देणारे ठरणार आहे. टीसीएल ने लॉंच केलेले हे वॉशिंग मशीन तीन रंगात उपलब्ध होणार असून सुरुवातीला याची किंमत केवळ १५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
या वॉशिंग मशीन मध्ये ऑटो एरर डायग्नोसिस टेक्नोलॉजीचा वापर केला असून याद्वारे झालेल्या बिघाडाचे निदान होऊन संभाव्य कारणे आणि दुरुस्तीची पद्धतही डिस्प्लेवर दिसणार आहे.नव्या तंत्रज्ञावर आधारित या मशीन मध्ये डिजिटल डिस्प्लेद्वारे ग्राहकांना वॉश टायमर समजणार आहे आणि सेटिंग करणे ही सोपे होणार आहे.त्याच प्रमाणे ग्राहकांना आपल्या सोयी नुसार धुणे थांबवून नंतर हव्या त्या वेळेवर ती प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
टीसीएलच्या नव्या वॉशिंग मशीननच्या श्रेणीत ईआरपी A+++ रेटिंग आहे.या सुविधे मुळे हे मशीन ग्राहकांचा पैसा आणि वेळेची बचत करणार आहे.तसेच या आधुनिक मशीन मध्ये कपडे धुण्याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे.असे कंपनी तर्फे सांगण्यात आले.वॉशिंग ड्रमच्या अनोखी हनीकोम्ब रचनेद्वारे कपड्याची नाजूक आणि योग्यरितीने काळजी घेतली जाते. हनीकोम्ब रचनेद्वारे ड्रम आणि कपड्यांमध्ये पाण्याचा हलका थर ठेवला जातो. त्यामुळे या थरावर हलकेपणाने धुण्याची प्रक्रिया होते आणि कपड्यातील धाग्यांचे रक्षण होते.टीसीएलने लॉन्च केलेल्या या नव्या वॉशिंग मशीन्समध्ये ऑटो ड्रम क्लीन टेक्नोलॉजी असून यामुळे ड्रम स्वच्छ करण्याचा त्रास कायमची दूर होणार असून तसेच या मध्ये असलेल्या ड्युएल डिटर्जंट केसद्वारे ग्राहकांना मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचे डिटर्जंट निवडता येणार आहे.