नाशिक महानगर पालिकेतील नगरसेवकांची संख्या १२२ वरून १३३ होणार !

0

नाशिक – राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे आता नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता १२२ वरून थेट १३३ होणार आहे.

नाशिक मध्ये सध्या अंदाजे २५ लाखांच्या घरात लोकसंख्या असल्याचे समजते. त्यामुळे शहरात १५१ नगरसेवक असावेत, असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याऐवजी नगरेसवकांची संख्या १२२ वरून १३३ अशी करण्यात आली आहे.नाशिकमध्ये २०१२ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. त्यानंतर यावर्षी होणारी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. त्यामुळे जुन्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे. या काळात शहराच्या लोकसंख्येत साधारणतः साडेतीन चार लाखांची वाढ झाली.

सध्या नाशिक महापालिकेत एकूण ६१ प्रभाग आहेत तर १२२ नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे ५ स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकी तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यानुसार नाशिकमधील प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम ६ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. त्यासाठी नाशिकची २०११ मधील लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

सध्याच्या कामानुसार प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम दिवाळीनंतरच जाहीर होणार होता. सध्या कच्च्या प्रभागरचेने काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, आता नगरसेवकांच्या संख्येत बदल झाला आहे. त्यामुळे या रचनेत पुन्हा बदल करावा लागेल. त्यामुळे प्रभाग रचना कार्यक्रमाला विलंब लागू शकतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.