मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत “मिडीआ”नाटकाला ६ लाखाचा प्रथम पुरस्कार
सेलिब्रिटी या नाटका साठी नाशिकच्या लक्ष्मी पिंपळे यांना अभिनयाचे रौप्य पदक
मुंबई, दि. १७ मार्च २०२५ – ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रुद्रेश्वर, गोवा या संस्थेच्या मिडीआ या नाटकासाठी रु.६ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे या संस्थेच्या मून विदाउट स्काय या नाटकास रु. ४ लाखाचे द्वितीय पारितोषिक आणि माणूस फाऊंडेशन, मुंबई या संस्थेच्या द फिलिंग पॅराडॉक्स या नाटकासाठी रु.२ लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.नाशिकच्या लक्ष्मी पिंपळे यांना विद्या करंजीकर दिग्दर्शित सेलिब्रिटी या नाटकासाठी अभिनयाचे रौप्य पदक मिळाले आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक- गंगाराम नार्वेकर (नाटक- मिडीआ)
द्वितीय पारितोषिक मुकुल ढेकळे (नाटक- मून विदाउट स्काय) तृतीय पारितोषिक- डॉ. सोमनाथ सोनवळकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स)
नेपथ्य: प्रथम पारितोषिक- सुमित शेलार (नाटक- मून विदाउट स्काय) द्वितीय पारितोषिक- सचिन गोताड (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स) तृतीय पारितोषिक- योगेश कापडी (नाटक- मिडीआ)
प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक निखिल मारणे (नाटक- मून विदाउट स्काय) द्वितीय पारितोषिक- प्रसन्न निकम (नाटक- इन्शाअल्ला)
तृतीय पारितोषिक- साईप्रसाद शिर्सेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स)
रंगभूषा : प्रथम पारितोषिक- एकनाथ नाईक (नाटक- मिडीआ) द्वितीय पारितोषिक- उल्लेश खंदारे (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स) तृतीय पारितोषिक- उल्लेश खंदारे (नाटक- लिअरने जगावं की मरावं)
संगीत दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक बिपीन वर्तक (नाटक- इन्शाअल्ला) द्वितीय पारितोषिक ऋषिकेश देशमाने (नाटक- संगीत मतीविलय)
तृतीय पारितोषिक कृष्णा देवा (नाटक- डिनायल)
उत्कृष्ट अभिनय : (रौप्यपदक)
पुरुष कलाकार :- अश्विन शर्मा (नाटक- हमीदाबाईची कोठी), महेंद्र कुरघोडे (नाटक- मोक्ष), यशवंत चोपडे (नाटक- ब्लॅकन्ड इक्वेशन), श्रीराम जोग (नाटक- हा खेळ पुन्हा खेळु), प्रणव सपकाळे (नाटक- मून विदाउट स्काय), डॉ. सोमनाथ सोनवळकर (नाटक-द फिलिंग पॅराडॉक्स), वैभव मावळे (नाटक- वाघमाऱ्या जानकीराम), अमोल देशमुख (नाटक- विक्रमाचा घातांक क्ष) महेश कोपरेकर (नाटक- डिनायल), पंकज दिवेकर (नाटक- इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स).
स्त्री कलाकारः- पूनम सरोदे (नाटक- वेटलॉस), वैष्णवी काकोडे (नाटक- मिडीआ), भावना चौधरी (नाटक- द ब्लॅकन्ड इक्वेशन), समृध्दी कोटगी (नाटक- इम्युनिटी द व्हॉइस ऑफ टॉलरन्स), मानसी गोसावी (नाटक- मून विदाउट स्काय), प्रेरणा खेडेकर (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), लक्ष्मी पिंपळे (नाटक- सेलिब्रिटी), अक्षता सुर्वे (नाटक- इन्शाअल्ला), श्रेयसी वैदय (नाटक- डिनायल), सिध्दी कुलकर्णी (नाटक- वाघमाऱ्या जानकौराम).
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे :-
पुरुष कलाकार :-मनिष उईके (नाटक- व्रणिता), सुनील मळेकर (नाटक- पाकीट), मंथन जाधव (नाटक-इम्युनिटी द व्हॉईस ऑफ टॉलरन्स), मयूर पाटील (नाटक- सितारों से आगे), उमेश चव्हाण (नाटक- वाघमाऱ्या जानकीराम)
स्त्री कलाकार :- शब्दुली सुतार (नाटक- दानव), मनुजा नार्वेकर लोकूर (नाटक- मिडीआ), स्नेहा घडवई (नाटक- लेबल), श्रध्दा शितोळे (नाटक- द फिलिंग पॅराडॉक्स), हर्षाली बेलवलकर (नाटक- सितारों से आगे).
दि. १७ फेब्रुवारी, २०२५ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत रंगशारदा नाट्यमंदिर, बांद्रा, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या अंतिम फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. शिवदास घोडके, श्री. रविंद्र अवटी, श्री. संजय पेंडसे, श्री. प्रदिप वैद्य आणि श्रीमती शंकुतला नरे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले,
राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.