हरि अनंत,नाशिक
रवि-चंद्र-मंगळ-गुरू-शुक्र-शनि : हा योग अतिशय भयंकर आहे लहानपणा – पासून कष्ट.वडिलोपार्जित इस्टेट नसते. बुद्धिमान, डॉक्टर, प्रोफेसर मार्गाकडे वळतात. संतती चांगली होते शांततेने आयुष्य जाते. थोडी इस्टेट होते.
रवि-चंद्र-बुध-गुरू-शुक्र-शनि :या योगातील व्यक्तींना आयुष्यात एक क्षण सुखाचा दिसत नाही. पत्नी एकटी राहते.तिला कष्ट करून खावे लागते. अंगी धाडस असत नाही. आयुष्यभर नोकरी करुन पोट भरावे लागते. त्यात समाधान मानून आयुष्य घालवते.
रवि-मंगळ-बुध-गुरू-शुक्र-शनि- : हा योगही एक चमत्कारिक योग आहे. झाला तर श्रीमंत नाहीतर भिकारी. बहुभार्या योग आहे. या व्यक्ती डॉक्टर रसायनशास्त्र, संशोधक, लेखक,कवि, कादंबरीकार, नाटककार, संपादक, टीकाकार,कायदेपंडित, वेदांती योगी, गायन- वादन, नर्तन या विद्या जाणणारे असतात. या योगे खूप पैसा मिळवितात. इस्टेट करतात. दानधर्म करतात. नोकर- चाकर सौख्य असते. राजकारणी मुत्सद्दी असतात.मोठं मोठे धंदे करणारे असतात.
चंद्र-मंगळ-बुध-गुरू-शुक्र-शनि : या योगात आयुष्यात फार मोठ्या घडामोडी २६ वर्षापर्यंत स्थिरस्थावरता नसते.नंतर स्थिर होतो. प्रथम मोठे धंदे करून दिवाळे काढतो. मग धंदा करून पैसा, घरदार,इस्टेट करतो.प्रवास फार होतो. मेकॅनिक इंजिनिअरिंगकडे लक्ष असते. थोडा बाहेरख्याली, संपत्ती, संतती, . या व्यक्तींचा नावलौकिक होतो.अधिकार मिळतो. नोकर चाकर, वाहन याचे सौख्य चांगले असते .
शनिचा संबंध हा केवळ जन्मपत्रिकेपुरता मर्यादित नाहीये, तर आपले नाव, आपले घर, घरातील व्यक्ती, ज्यांच्या बरोबर आपले अतिशय घनिष्ठ संबंध आहे. या सर्वांचा विचार करून शनि विषयी निर्णय घ्यावा लागतो. काही वेळा शनी विषयी मनात खूप भीती बाळगली जाते; पण शनीची भीती वाटावी एवढा भयंकर शनी नाहीये.शनीग्रह हा अतिशय कृपाळू आहे- कृपया शनिविषयी गैरसमज नसावा. प्रत्येक मालमत्तेचा कुणीतरी मालक असतो. विचार करा तुमच्या घरात पाच व्यक्ती असतील त्यात चार व्यक्ती शनीच्या असतील तर तुमच्या घराचा मालक कोण-? ?? (क्रमशः) भाग- १४३
टीप – तीन ते सहा योग जे दिले आहेत ती सर्व फळे त्याच्या युतीत मिळतात असे नाही. याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे ही युती कोणत्या स्थानात होते, कोणत्या लग्नास होते व त्या त्या ग्रहांची मैत्री-शत्रुत्व राशी गुणधर्मावर अवलंबून असते सोबत असलेल्या शनीची भूमिका समजून घेणे महत्वाचे आहे त्याचा विचार करून फळे पहावीत.. काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,आपला – हरिअनंत,नाशिक
संपर्क-9096587586