रवि-गुरू-शनि ही युती ज्योतिष शास्त्रात निरुपयोगी युती आहे. ही युती असणाऱ्या व्यक्तींचा संसार कसातरी होतो. पूर्ववयात अत्यंत हलाखीची स्थिती, अत्यन्त दारिद्र्य,आपत्ती वगैरेनी अतिशय गांजलेले असतात. संतती पुष्कळ असते . उतारवयात बऱ्यापैकी सुखी जीवन असते. बुद्धी स्थिर असते. अनेक व्यवसाय करतात,पण चालत नाहीत. नोकरी करावी लागते. पुत्र संतती वृद्धपकाळात मनाविरुद्ध वागून त्रास देतात, पण ते पितृपश्चयात भाग्योदयाला चढतात.
रवि- शुक्र- शनि: ही युती शास्त्रकाराच्या विरुद्ध काही वेळेला दिसून येते. आचरण उत्तम, परस्त्री न पाहता माता मानणारा. द्विभार्या करण्याचा योग, परंतु विशेष करून बायको एकटीच राहते. पण ह्या व्यक्ती शौकीन. चैनीच्या उद्योगात, नाटकाशी, सिनेमाशी येणाऱ्या उद्योगात फार दिसून येतात. हा योग दशमात चांगला होतो. मात्र हा योग पितृपश्च भाग्योदय किंवा दत्तकयोग दर्शवतो.