आजचे राशिभविष्य शनिवार, १८ सप्टेंबर २०२१ 

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
राहूकाळ- सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ (रात्री ३.२१ पर्यंत) आज क्षय दिन, *शनिप्रदोष* आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
 
मेष:-येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील. दुपारनंतर कामाला वेग येईल.
     
वृषभ:- कामाच्या ठिकाणी वजन राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. 
 
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची आज काळजी घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात कामे मार्गी लागतील.
 
कर्क:- वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. स्पर्धेत विजय तुमचाच होईल. नेतृत्वगुण सिद्ध होईल.
  
कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल.
 
तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल.
 
वृश्चिक:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. गुप्तशत्रू त्रास देतील. कमी बोलणे हिताचे आहे. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.
 
धनु:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आळस झटकून कामाला लागा. कामात सातत्य राखा.
 
मकर:- खर्चात वाढ होणार आहे. उगाच मनाला लावून घेऊ नका. ध्यान धारणा करा. 
 
कुंभ:- गुप्तशत्रूपासून दूर रहा. स्पष्ट भूमिका घ्या. कठोर बोलणे टाळा. महत्वाची कामे दुपारी करा. 
 
मीन:- खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. मन शांत ठेवा. क्रोध आवरा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.