आजचे राशिभविष्य शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण त्रयोदशी / सकाळी १०.४८ नंतर चतुर्दशी. पराभव नाम संवत्सर, शके १९४८, शरद ऋतू.
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र – चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या / संध्याकाळी ५.१५ नंतर तूळ.
चंद्र लाभ मंगळ आणि चंद्र लाभ गुरू योगामुळे काही बाबतींत अनुकूलता लाभेल. चंद्र युती शुक्र योगामुळे कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत समाधान मिळू शकते. मात्र बुध षडाष्टक शनी योगामुळे बोलताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. संयमाने आणि विचारपूर्वक काम करणे हिताचे ठरेल.

राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)

मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) कामाच्या ठिकाणी काही अनुकूल घडामोडी होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा.

वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधा.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा) कामात नवीन संधी उपलब्ध होतील. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित सांभाळा.

कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो) कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत अनुकूलता लाभेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बोलताना संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळा.

कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो) आपल्या राशीत चंद्र असल्याने कामात उत्साह राहील. चंद्र लाभ मंगळ आणि गुरू योगामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. मात्र बुध षडाष्टक शनी योगामुळे व्यवहारात सावधगिरी बाळगा.

तूळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते) संध्याकाळी ५.१५ नंतर चंद्र आपल्या राशीत प्रवेश करेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहारात नियोजन आवश्यक आहे. कौटुंबिक बाबतीत संयम राखा. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.

वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु) कामाचा व्याप वाढू शकतो. नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाव्या लागतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. मानसिक शांतता राखा.

धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे) सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात नियोजन महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळा.

मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी) कामाच्या ठिकाणी प्रगती साधता येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

कुंभ:– (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा) भाग्याची साथ मिळेल. नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात मन रमेल.

मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची) दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी संवाद साधताना गैरसमज टाळा. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!