मुंबई – ज्या कार्यक्रमाची उत्सुकता महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांपासून होती तो लोकप्रिय शो म्हणजे “बिग बॉस मराठी”.आता बिग मराठीचा तिसरा सिझन उद्या १९ सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ठरला आहे. या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे आपल्याला उद्या संध्याकाळी ७ नंतर समजेलच परंतु बिग बॉसच्या यंदाच्या सिझनचे घर कसे असणार ? हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. चला तर मग पाहूया बिग बॉस मराठी ३ चे घर आतून कसे आहे… या नव्या पर्वात काय आहे खासियत जाणून घेऊया ..