सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र  

0

हरिअनंत,नाशिक 

रवि-गुरू-शनि ही युती ज्योतिष शास्त्रात निरुपयोगी युती आहे. ही युती असणाऱ्या व्यक्तींचा संसार कसातरी होतो. पूर्ववयात अत्यंत हलाखीची स्थिती, अत्यन्त दारिद्र्य,आपत्ती वगैरेनी अतिशय गांजलेले असतात. संतती पुष्कळ असते . उतारवयात बऱ्यापैकी सुखी जीवन असते. बुद्धी स्थिर असते. अनेक व्यवसाय करतात,पण चालत नाहीत. नोकरी करावी लागते. पुत्र संतती वृद्धपकाळात मनाविरुद्ध वागून  त्रास देतात, पण ते पितृपश्चयात भाग्योदयाला चढतात.

 

रवि- शुक्र- शनि: ही युती शास्त्रकाराच्या विरुद्ध काही वेळेला दिसून येते. आचरण उत्तम, परस्त्री न पाहता माता  मानणारा. द्विभार्या करण्याचा योग, परंतु विशेष करून बायको एकटीच राहते. पण ह्या व्यक्ती शौकीन. चैनीच्या उद्योगात, नाटकाशी, सिनेमाशी येणाऱ्या उद्योगात फार दिसून येतात. हा योग दशमात चांगला होतो. मात्र हा योग पितृपश्च भाग्योदय किंवा दत्तकयोग दर्शवतो.              

 

रवि बरोबर चार ग्रहांची युती झाली असता मिळणारी फळे                      

 

रवि-चंद्र मंगळ-शनी – नेत्ररोगी,शिल्पकार, सुवर्णकार,शास्त्रज्ञ,धनी, धैर्यवान, नेत्रचंचल, प्रवासी, निर्धन, व्यभिचारी, वेश्यागमनी, व्यसनात पैसे खर्च करणारे.     

रवि-चंद्र-बुध- शनि – विकलांग देही, वाकपटू, चंचल, शीलवान, कार्यकुशल, यंत्रज्ञ, निर्धन वबकृतज्ञ

 

रवि- चंद्र-गुरू- शनि –  तामसी, हट्टी, कुलीन,सुखी, निंदक, कार्यरत,, नेत्र मोठे, संपत्ती, पुत्र पुष्कळ, वेश्यापती, प्रवासी, परदेशगमन, बुद्धिवान, श्रीमंत, अनैतिक आचरण.

   

 रवि- चंद्र-शुक्र-शनि –  दुर्बल देही, स्रीरत, व्यभिचराकडे कल, मुलीपासून धन- प्राप्ती, खादाड, भित्रा, तरुण स्त्रीकडे वावरणारा,संपन्न

 

रवि -मंगळ-बुध- शनि – कवी , मंत्री, सुखी, सन्मानी, नेत्र व वेष चमत्कारिक चोरीची वासना असलेल्या व्यक्ती, एकही चांगला गुण नसलेला. सैन्याचा नायक, लोकाग्रणी, राजाचा मंत्री, वाट्टेल ती नीच कृत्य करणारा, अनेक तऱ्हेने सुख भोगणारा.   

 

रवि- मंगळ-गुरू- शनि – राजमान्य, कुटुंबप्रेमी, साधुसेवाप्रिय, कार्यकुशल, व्यापारी, मिल  वगैरेचा संस्थापक, शिक्षक,शास्त्रज्ञ, खालावलेला, भ्रमिष्ट, मित्र- आप्त यांनी युक्त अंध, भटकणारा, पुष्कळ आप्त व नातेवाईक असणारा.  

       

रवि-मंगळ-शुक्र- शनि – बंधुद्वेषी, अपयशी, दुराचारी, मलिन,नीच कर्म करणारा, दुःखी, पुढारी, अपकीर्ती, मंद आळशी अनेक विद्या जाणणारा.

 

रवि-बुध-गुरू- शनि- मानी, भांडखोर, कवी, संशोधक, संपादक,साहित्यिक, वाईट आचरणाचा. अनेक तंटे उत्पन्न होतील. सन्मानीय-(क्रमशः)

 भाग – १३८ 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक
संपर्क –  9096587586

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.