शनी युती मेष,सिंह,धनू,कर्क,वृश्चिक, मीन व मिथुन राशीत शिक्षणाकरता परदेश-गमन करावे लागते. भाग्योदय वयाच्या 33पासून सुरू होऊन 49ला परिसीमा होते.( गेल्या तीन- चार भागात आपण राहू-शनी युती विषयी बोलत आहोत.)
दशमस्थां- ही युती असेल तर पूर्ववयात कष्ट सोसून पुढे फार उदयास येतात. या व्यक्ती कोणत्या दिशेला वळतील याचा भरवसा वाटत नाही. या युतीत फळ व कल्पनातीत उत्तम मिळते. वयाच्या 36 पासून भाग्योदयाला प्रारंभ होतो.बायका जास्त होतात अथवा संतती कमी होते. नावलौकिकता प्राप्त होते.
एकादश ( लाभस्थान)– ,या स्थानात ही युती असेल, तर पैसा फार मिळतो. या व्यक्ती अतिशय लोभी. संतती बद्दल अनिष्ट फल मिळते.सर्पशापाने संतती क्षय होते. गर्भपात होतात. पुत्र अकाली निधन पावतात.या व्यक्तींविषयी जनतेत वाईट अफवा पसरलेल्या असतात.
द्वादशस्थान(व्ययस्थान) या स्थानात ही युती फार पराक्रमी असते. जन्म ज्या परिस्थितीत झाला असेल,त्या मुळच्या परिस्थतीपेक्षा या व्यक्ती पुढे येतात व अधिकार व संपत्ती मिळण्याचा संभव असेल,तेथे अत्यंत वाम मार्गाने अधिकार व संपत्ती मिळवतात.
कदाचित एखाद्याची हत्या, विषप्रयोगदेखील करायला या व्यक्ती मागे- पुढे पाहत नाही. इतक्या दुष्ट मार्गाने धन मिळवल्यानंतर त्यांच्या हृदयात औदार्याचा महापूर येतो. कारण ते जनतेने विसरून जावे व आपल्याबद्दल सहानुभूती उत्पन्न व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो.पुत्र संतती कमी. फार तर एक-दोन होतात. एक पुत्र मोठा होऊन यांच्यासमोर प्राण गमावतो.स्त्रीशी पटत नाही.अडचणीत संसार होतो.उद्योगधंदे मोठ-मोठे होतात. नावलौकिक होतो. oविदेशयात्रा करतात पण सुख प्राप्त होत नाही. (शनी-राहू युती समाप्त)
आरोग्य
रवि-शनि अशुभ योगात आरोग्य चांगले राहत नाही. थंडी,संधिवात,दृष्टिदोष, अपघात
– रवि, शनि,राहू,केतू षष्ठ स्थानी युती असता अपचन,वातजन्य विकार,जनावरापासून अपघात.
-रवि- शनि युती अष्टम स्थानी जाहली असता आरोग्याला एक कुयोगच समजावे अनेक प्रकारे जिवावरची दुखणी उत्पन्न होतात. पचनक्रिया मंदावते,मूळव्याधींचा त्रास, अपघात वरचेवर आयुष्यासही धोका
– रवि- शनि युती नवमस्थानी-दिर्घकाल आजार,अतिशय हालाहल होऊन मृत्यूचा धोका संभवतो लौकिक, श्रेष्ठत्व,कीर्ती,उद्योग, नोकरी सत्ता यात सुख- दुःख
– रवि- शनि शुभयोग वडील,आप्त इष्ट यांच्याकडून भरपूर फायदा,व्यहारदक्षतेने सांपत्तिक स्थिती उत्तम सत्ताप्राप्ती.रवि- शनि अशुभयोगात अनुकूल गोष्टी विलंबाने होतात, निराशा. बिलकुल सुख मिळत नाही. नोकरी मिळण्यास फार कष्ट, पैसे कितीही मिळाले तरी आयुष्यात मोठी आपत्तीच.