नाशिक – नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे ३० रुग्ण आढळल्याची धक्कदायक बाब सोमर आली आहे. यातील दोन रुग्ण नाशिक शहरातील असून उर्वरित रुग्ण नाशिकच्या वेगवेगळ्या तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
नुकतेच नाशिक मध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचे ३० रुग्ण रुग्ण आढळल्याने प्रशासना सह आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोरोनाचा धोका अजून कमी झाला नसून नागरीकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे प्रशासना तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमधून राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेला १५५ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. ज्या तालुक्यांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
हा व्हेरिएंट केवळ डेल्टा आहे.सूरज मांढरे, जिल्हाधिकारी