‘अबोली’ मालिकेत होणार रेशम टिपणीसची एण्ट्री 

0

मुंबई – स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या अबोली मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सोनियाच्या खुनाच्या तपासात इन्सपेक्टर अंकुश आणि अबोली एकत्र लढत आहेत.या तपासात अबोली ही महत्वाची साक्षीदार आहे. त्यामुळे सोनियाचा खुनी अर्थातच विश्वासची अटक ही निश्चित झालीय. यातून पळवाट शोधण्यासाठी आता विश्वासने एका वकिलाची मदत घेण्याचं ठरवलं आहे. विजया राजाध्यक्ष असं या वकिलाचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

अबोली मालिकेतील या व्यक्तिरेखेविषयी सांगताना रेशम टिपणीस म्हणाल्या, ‘अबोली मालिकेच्या निमित्ताने मी खूप दिवसांनंतर मराठी मालिकेत काम करतेय. जेव्हा या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तेव्हा हे पात्र मला खूप आवडलं त्यामुळे मी लगेच होकार दिला. विजया राजाध्यक्ष पेशाने वकिल आहे. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व आहे. कोणतीही केस लढवताना पैसे मिळवणं हा एकच हेतू तिच्या मनात असतो. विजयाच्या एण्ट्रीने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे.

अबोली दररोज रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.