आजचे राशिभविष्य शनिवार, ३० ऑक्टोबर २०२१  

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, नवमी/दशमी दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस घबाड योग (दुपारी २.४४ नंतर) आहे.
चंद्र नक्षत्र -आश्लेषा (दुपारी १२.५२ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे दुपार नंतर पूर्ण करा. तत्वाने वागणे हिताचे आहे. स्पष्ट भूमिका घ्याल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभ होतील. प्रवासातून नवीन ओळखी होतील. दुपारनंतर आळस वाढेल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रसन्न वाटेल. उत्तम लाभ होतील. वक्तृत्व कामास येईल.  
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कुटुंबा समवेत वेळ व्यतीत कराल.  मौज कराल. आत्मविश्वस वाढेल.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल. महत्वाची कामे दुपारनंतर करा. आरोग्य सांभाळा.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. भरपूर लाभ होतील. सकाळच्या वेळात कामे पूर्ण करा.
 
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. वरिष्ठ खुश होतील.  शब्दास वजन प्राप्त होईल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गूढ विद्यांचे आकर्षण वाटेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक कामास येईल.
 
धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे)  सकाळ आळसात जाईल. जेष्ठांशी संवाद होईल. धनलाभ होईल. दुपारी उत्साह वाढेल.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. वाहने जपून चालवा.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ चांगले होतील.महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दुपारनंतर आरोग्याची काळजी घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दुपारनंतर अत्यंत उत्तम दिवस आहे.  आर्थिक आवक चांगली राहील. पराक्रम गाजवाल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.