ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण चतुर्थी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे” *अंगारकी चतुर्थी* (मुंबई चंद्रोदय रात्री ९.०५ वाजता)घबाड – दुपारी १.४४ नंतर रात्री १२.५६ पर्यंत)
चंद्र नक्षत्र – आर्द्रा (दुपारी १.४४ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- काही गूढ घटना घडतील. सूचक प्रसंग सामोरे येतील. योग्य सल्ला घ्या.
वृषभ:- कामाचे स्वरूप बदलेल. आधी ठरवलेले नियोजन चुकू शकेल. शब्दास जागावे लागेल.
मिथुन:- मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हुरहूर वाटेल. महत्वाचे करार आज नकोत.
कर्क:- भावंडांशी वाद नकोत. वारसा हक्काचे प्रश्न सामोपचाराने सोडवा. उष्णतेचे त्रास जाणवतील.
सिंह:- आजचा दिवस भरपूर यश देणारा आहे. आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. नवीन कार्याची मुहूर्तमेढ होईल.
कन्या:- सरकारी कामात अडथळे येतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
तुळ:- प्रसन्न सुटतील. अनेक नवीन उत्तरे मिळतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल.
वृश्चिक:- प्रतिकूल रवी, बुध, केतू अस्वास्थ्य निर्माण करतील. कामाला मर्यादा येतील. खर्चात वाढ संभवते.
धनु:- कुलदेवतेचे दर्शन घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. पती/पत्नीशी जुळवून घ्याल.
मकर:- योग्य सल्ला मिळेल. अनुकूलता वाढीस लागेल. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा.
कुंभ:- अनुकूल शुक्र सौख्य प्रदान करेल. दैवी उपासना घडेल. अनामिक भय दूर होईल.
मीन:- जंगले, बगीचा यात वावर वाढेल. वाहन सुख मिळेल. खाणी संबंधित व्यवसायात लाभ होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)