असा असणार ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य मंडप

0

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथील कुसुमाग्रज नगरीत ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबरच्या दरम्यान संपन्न होणार आहे. नुकताच या संमेलनाच्या मुख्य मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.या संमेलनासाठी ६० मीटर रुंदीचे आणि २५० मीटर लांबीचे लॉंग स्पेन असलेले जर्मन स्ट्रक्चर वापरून एक मोठा हॉल बनवण्यात येत आहे साधारण सात हजार लोकांची एकाच वेळी मोकळेपणे बसता येईल अशी व्यवस्था या भव्य मंडपात करण्यात आली आहे.अशी माहिती  मंडप समिती  प्रमुख रंजन ठाकरे आणि उप प्रमूख वास्तुविशारद दिनेश जातेगांवकर यांनी जनस्थान ऑनलाईनला दिली.

This will be the main pavilion of the 94th All India Marathi Sahitya Sammelan

या व्यतिरिक्त दोन्ही बाजूस मोकळी जागा आणि इतर सोयी ठेवलेल्या आहेत,  स्टेज च्या मागच्या बाजूला व्हीआयपी कक्ष व  पुढील बाजूला मीडियासाठी जागा, त्यानंतर व्हीआयपी सेटिंग असेल ,स्टेज ची साईज साधारण ८० फूट बाय ४५ फूट असेल स्टेजवरती तीन वेगवेगळ्या लेव्हल्स ठेवण्यात येथील स्टेज च्या दोन्ही बाजूस एलईडी वॉल असतील या पूर्ण सभागृहात येण्यासाठी साधारण पाच द्वार असतील या सभाग्रहा नंतर मान्यवरांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल त्यानंतर किचनची व्यवस्था असेल या पुर्ण सभागृहात एकूण वेगवेगळ्या ठिकाणी १२ एलईडी स्क्रीन असतील जेणेकरून सभागृहात बसलेल्या लोकांना कुठल्याही अडचणी विना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील,

या व्यतिरिक्त संमेलन स्थळी एक उप मंडप असेल ज्याची क्षमता २५० सेटिंग ची असेल ह्या उप मंडपाच्या व्यतिरिक्त इतर तीन सभागृहे असतील या सभागृहांची शमता दीडशे लोकांची असेल याव्यतिरिक्त बालकवी मंच, कवी कट्टा, गझल कट्टा, पुस्तक प्रदर्शन मंच आणि ग्रंथप्रदर्शन असेल , संमेलन नाशिकमध्ये होत असल्याने नाशिकचे वैभव विस्तृतपणे सांगणारे नाशिकचे पॅव्हेलियन येथे असेल, महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळावी याकरता संमेलनामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.