टोकियो – टोकियो ऑलम्पिकमध्ये आज भारताने इतिहास घडविला आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. नीरजने पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्यानं आघाडी मिळवली होती . भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदक मिळवून देतो का याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागलं होतं, अखेर करोडो भारतीयांचं स्वप्न नीरज चोप्रानं पूर्ण केलं आहे.
दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं ८७.५८ मीटर एवढ्या अंतरावर थ्रो फेकला आहे.पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.नीराजच्या विजया नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून नीरज चोप्राला ६ कोटीचे बक्षीस जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं ६ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.