टोकयो : भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे.टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी आपली आगेकूच कायम ठेवली असून आज भारताच्या खात्यामध्ये अजून एक पदक निश्चित झालं आहे.भारताच्या रवीकुमार दहियाने २ वेळचा जगज्जेता असणाऱ्या नरिस्लाम सान्यायेव्हला या कजाकिस्तानच्या खेळाडूला हरवलं आहे.५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल रेससिंग प्रकारात भारताला पहिलं गोल्ड मिळण्याची आशा आता पल्लवित झाल्या आहे.
हरयाणातल्या एका छोट्या गावात वाढलेला रविकुमार दहियाचे शेतात मजुरी करून पोट भरणारे सामान्य कुटुंब शेतकऱ्याचा मुलगा असलेला रवीकुमार दहियाने २०१९ मध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनी गटात ब्राँझ पदक जिंकून त्याने देशां लक्ष वेधून घेतलं होतं. शेतकऱ्याचा मुलगा. २०१९ मध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ५७ किलो वजनी गटात ब्राँझ पदक जिंकून त्याने देशां लक्ष वेधून घेतलं होतं.
आज रवी कुमारनं सामन्याच्या सुरुवातीला २-१ अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सान्यायेव्हला जोरदार खेळ करत रवीवर ९-२ ने आघाडी घेतली. त्यानंतर सान्यायेव्हला फिटनेसची समस्या जाणवू लागल्याने रवीकुमारनं ही आघाडी ५-९ ने कमी केली. त्यानंतर रवीकुमारनं जोरदार खेळ करत ७-९ ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.टोकियो ऑलिम्पिकमध्ये आता फायनलमध्ये तो सुवर्णपदकाचा दावेदार ठरणार असा खेळप्रेमींना विश्वास आहे.