महाड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या नंतर आज दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक करण्यात आली होती.आज रात्री उशिरा न्यायालयात हजर केले असता सुमारे २ तासाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केला आहे या मागे काही षडयंत्र आहे का ? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.परंतु नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही नोटीस दिली नव्हती. आणि नारायण राणे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद नारायण राणे यांच्या वकिलांनी केला होता.अखेर नारायण राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
नाशिक आणि पुणे पोलीस नारायण राणे यांचा ताबा मागणार नाही अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे.