अमेरिकेत ८ नोहेंबर पासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

0

अमेरिकेतील कोरोना महामारीची परिस्थिती हळूहळू सुधारत जरी असली तरी कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत लहान मुलांची लसीची वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. अमेरिकेत ८ नोव्हेंबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होता आहे.आता अमेरिकेतील लहान मुलांना फायझर लसीचा डोस देण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रपती जो बायडन यांनी म्हटलंय की, लहान मुलांचे लसीकरण हा आपल्यासाठी एक ‘टर्निंग पॉईंट’ आहे.”महिन्यानंतर अमेरिकेत लहान मुलांसाठीच्या लसीची वाट पाहणाऱ्या पालकांचा प्रतिक्षा संपली आहे. अमेरिकेनं घेतलेला हा निर्णय लहान मुलांद्वारे दुसऱ्यांपर्यंत व्हायरस पसरणाऱ्याची शक्यता कमी करतो. व्हायरसला हरवण्यासाठी आपली लढाई आपल्या देशासाठी एक मोठं पाऊल आहे.”

वृत्तसंस्था एएफपीनं सेंटर्स फॉर डिजिटल कंट्रोल अँड प्रिवेंशनचा हवाल्यानुसार अमेरिकेत ५ ते ११ मुलांमधील लसीकरणाच्या आपातकालीन वापराची परवानगी दिली होती. एफडीएनं लहान मुलांसाठी फायझरच्या लसीचा १० मायक्रोग्रामचा डोस अधिकृत केला आहे. तसेच १२ वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या मुलांसाठी ३० मायक्रोग्रामचा डोस देण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.