पुणे | २३ मे २०२५ – Vaishnavi Hagavane Suicide Case महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे. तब्बल आठ दिवसांपासून फरार असलेले मुख्य आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली.
🔴 प्रकरणाचा संपूर्ण आढावा :(Vaishnavi Hagavane Suicide Case)
१६ मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, सासरच्यांनी वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली आहे.
🛑 राजकीय दडपणात पोलिस कारवाईचा वेग:
राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असल्यामुळे प्रकरणाचा राजकीय रंग गडद झाला. अजित पवारांनी “माझा याच्याशी काहीही संबंध नाही. अॅक्शन घ्या, कुठं पळून जातो ते पाहू!” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
👶 वैष्णवीच्या मुलाच्या ताब्यावरून वाद:
वैष्णवीचा ९ महिन्यांचा मुलगा कोणाच्या ताब्यात द्यावा यावरून मोठा वाद झाला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालत मुलाचा ताबा वैष्णवीच्या आई-वडिलांकडे देण्याचे आदेश दिले. गुरुवारी सायंकाळी मुलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
📹 सीसीटीव्ही फुटेजने उघड केलं वास्तव:
राजेंद्र आणि सुशील हगवणे स्वारगेटमधील एका हॉटेलमध्ये लपलेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समोर आले. त्यानंतर पहाटे ५:३० वाजता पोलिसांनी अटक केली.
💔 हुंड्याची अमानुष मागणी :
वैष्णवीचा प्रेमविवाह असून, लग्नात तिच्या माहेरकडून ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली गेली होती. तरीही सासरकडून २ कोटी रुपये आणि जमीन खरेदीसाठी दबाव टाकण्यात आला. शशांक हगवणे याने वैष्णवीवर चारित्र्याविषयी संशय घेत वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं समोर आलं आहे.
🔍 सध्याची परिस्थिती:
अटक आरोपी : राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे
आधीच अटकेत : शशांक, लता, करिश्मा हगवणे
पोलिस कोठडी : २६ मे २०२५ पर्यंत
गुन्हा : IPC अंतर्गत हुंडा प्रतिबंधक कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे
पुढील टप्पा : पोलिसांकडून ठोस पुरावे गोळा करण्याचं काम सुरू
[…] […]