नाशिक – नाशिक पुणे महामार्गावरील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला नारायणगांव बायपासचे काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे नाशिक पुणे प्रवास आता जलदगतीने होणार आहे.केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटर वरून या रस्त्याची माहिती दिली आहे.रस्त्याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
नाशिक – पुणे महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या काही वर्षांपासून धीम्या गतीने सुरु होते.नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते नारायणगाव, नारायणगाव ते चाकण अशा विविध टप्प्यांमध्ये ते सुरू होते. संगमनेर आणि सिन्नर बायपास मार्गी लागल्यानंतरही नारायणगावचा बायपासचा प्रश्न प्रलंबित होता.अखेर तो आता संपुष्टात आला असून नारायणगाव बायपास वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.सुमारे ५ किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बायपास रस्त्याचे काम २०१८ मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या रस्त्याचं काम पूर्ण झाले असून, पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहजशक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही प्रवाशांची सुटका होणार आहे.
दरम्यान बायपासच्या उद्घाटनावरून अमोल कोल्हे, आढळराव पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झालेली दिसते आहे. अमोल कोल्हेंच्या आधी आढळरावांनी या बायपासचं उद्घाटन केलं आहे.
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 16, 2021