नाशिक शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

1

नाशिक – नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४० दिवस पुरेल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे.गंगापूर धरण क्षेत्रासह नाशिक शहरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने नाशिक शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.आज झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

येत्या २२ जुलै पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून गंगापूर धरणात ५० टक्के पाणी साठा होत नाही तो पर्यंत हा निर्णय लागू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

काही दिवसापूर्वीच महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ६ दिवसात धरण क्षेत्रात पाऊस न झाल्यास नाशिक शहरात पाणी कपात करावी लागेल असे सांगितले होते. परंतु अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने हा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. Vasant says

    How Chhagan Bhujbal knows everything of everything ?

कॉपी करू नका.