छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविणार- दिलीप खैरे
अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त‘भुजबळ साहेब एक संघर्ष योद्धा’व्याख्यानमालेचे आयोजन – विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक
नाशिक-राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचा यंदाचा वाढदिवस हा अमृतमहोत्सवी वाढदिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२२ या वर्षभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवीत हा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक येथील कार्यालयात आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, दिलीप तुपे, योगेश कमोद यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांचा यंदाचा ७४ वा वाढदिवस साजरा होत असून ते अमृतमोहोत्सव वर्षांत पदार्पण करत आहे. त्यांच्या या अमृतमोहोत्सवी वर्षांनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच वर्षभरात रक्तदान शिबिरे, शाखा उदघाटने, रोगनिदान शिबिरे, महिलांसाठी कॅन्सर व अन्य रोगनिदान शिबिरे, मुक्या पाळीव जनावरांचे रोगनिदान शिबीरे, जेष्ठ नागरिक मेळावे, नोकरी विषयक मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, अनाथ मुलांना दत्तक घेणे, संघर्ष योद्धा व्याख्यान मालिका, कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, रेशन कार्ड शिबीरे, नेत्र व मधुमेह तपासणी शिबिरे, फळे, मिठाई वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, भुजबळ साहेब हे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. सामजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासन, चळवळ, बेधडक पणा या विविध पैलूने त्यांचे व्यक्तीमत्व तयार झाले आहे. त्यामुळे त्यांचा हा अमृतमोहोत्सवी सोहळा त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसा व्हावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त‘भुजबळ साहेब एक संघर्ष योद्धा’ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असून वर्षभरात ७५ ठिकाणी ही व्याख्यान माला घेतली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी अमोल कमोद, राजेंद्र जगझाप, ज्ञानेश्वर महाजन, अनिल नळे, कैलास झगडे, सागर बेदरकर, भालचंद्र भुजबळ, सतीश आमले, नितीन चंद्रमोरे, संजय काकड, संदीप लोंढे, विशाल चव्हाण, संतोष पवार, विकास दरोडे, राजेंद्र भगत, गजू घोडके, संदीप काळे, रघु आहेर, आहेरयु.के., सतीश सोनवणे, आकाश विश्वकर्मा, बाळासाहेब जाधव, निवृत्ती पवार, ज्ञानेश्वर नाईकवाडे, प्रशांत शेवाळे, संतोष कमोद, व्यंकटेश जाधव, वैभव थेटे, शंकरभाई मंडलिक, सचिन देशमुख,डॉ.योगेश गोसावी, शिवा काळे, श्रीराम मंडळ, सोनू काठे, राजू पवार, नाना पवार, वैभव गांगुर्डे, मोहन गवळी, योगेश ठाकरे, आत्माराम भोये, सागर अभंग, भूषण शिंपी, दर्शन जेजुरकर, आशिष फुलसुंदर,अॅड.रवींद्र ताजणे, विनोद शेलार, राहुल घोडे, नामदेव पवार, सुभाष शेजवळ, भाऊसाहेब पवार, सचिन तारगे, अशोक काळे, कुणाल पैठणकर, संतोष पुंड,इंजि.दिनेश उघाडे, रवींद्र शिंदे, हरिष महाजन, रवींद्र वाघले, नाना सोमवंशी, सचिन दप्तरे, अभिजित राऊत, विलास दराडे, सागर गोरे, सुरेश विंचू, पवन पाटील, पांडुरंग काकड, राजेंद्र धात्रक, वैभव थेटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.