नाशिक – नाशिक मधील ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे आज सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ९४ वर्षांचे होते.सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक सुभाष दसककर यांचे ते वडील होते.
नाशिक मधील जेष्ठ संगीत शिक्षक, तसेच वादक म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांचे संगीत शिक्षण काका पंडित एकनाथ दसककर तसेच ग्वालीयर येथील ग्वालीयर घराण्याचे पंडित राजाभैया पुंछवाले यांच्या कडे झाले ,ज्या काळा त महिलांनी गाणे म्हणणे किंवा शिकणे व्यर्ज होते त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना करून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले संपूर्ण हरिपाठाला रागदारी तील वैविध्यपूर्ण रागांमध्ये संगीतबद्ध केले.
त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी सुना,नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे. पं.प्रभाकर दसककर यांच्यावर सकाळी ८:३० वाजता नाशिकच्या अमरधाम स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रद्धांजली
नाशिक मधील ज्येष्ठ हार्मोनियम वादक पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अतिशय दुःख झाले. नाशिक मधील जेष्ठ संगीत शिक्षक , तसेच वादक म्हणून त्यांची ख्याती होती. ज्या काळात महिलांनी गाणे म्हणणे किंवा शिकणे व्यर्ज होते. त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाची स्थापना करून अनेक महिलांना संगीत शिक्षण दिले संपूर्ण हरिपाठाला रागदारी तील वैविध्यपूर्ण रागांमध्ये संगीतबद्ध केले. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मी व माझे कुटुंबीय दसककर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच पार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.