📍 नाशिक | ६ मे २०२५ – Water cut in Nashik city नाशिक शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना! येत्या शनिवार, दिनांक १० मे २०२५ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे हे नियोजित शटडाऊन करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीचे काम प्रगतीपथावर असून, विविध जलशुध्दीकरण केंद्रे आणि जलकुंभ येथे यासाठी यंत्रणा बसवली जात आहे. त्याचबरोबर बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्रातील नव्याने उभारलेले सबस्टेशन कार्यान्वित करण्यासाठी चाचणीही पार पाडली जाणार आहे. यासाठी नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी कंपनी लिमिटेड यांनी शटडाऊनचे नियोजन केले आहे.
🔧 कोणकोणती कामं होणार?
जलशुध्दीकरण केंद्रांची देखभाल आणि स्काडा बसवणे
सबस्टेशनची चाचणी
गंगापूर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवर दुरुस्ती
मान्सूनपूर्व देखभाल
🚱 या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार:( Water cut in Nashik city)
गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन
चेहेडी पंपिंग स्टेशन
मुकणे धरण पंपिंग स्टेशन
सर्व जलशुध्दीकरण केंद्रे आणि जलकुंभ
त्यामुळे १० मे रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहणार आहे.
⚠️ नागरीकांनी कृपया लक्षात घ्यावं:
१० मे रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद
११ मे (रविवार) रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल
पाणी साठवून ठेवावे आणि मनपाला सहकार्य करावे
महानगरपालिकेचे आवाहन आहे की, नागरीकांनी घबराट न करता योग्य नियोजन करावे आणि पाणी वापरताना दक्षता घ्यावी.