नाशिक – पवार तबला अकादमीचे सर्वेसर्वा आणि नाशिकमधील सुप्रसिद्ध तबलावादक गुरूवर्य नितीन पवार यांची तबला कार्यशाळा दिनांक १७,१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केली आहे. नाशिकमधील सर्वांचे परिचित विख्यात आणि विद्वान तबलावादक गुरू पं. भानुदास पवार यांचा १७ डिसेंबर हा स्मृतीदिन (पुण्यस्मरण) असून यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. त्यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून “म्युझोफ्रिक”-स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेने ही सुवर्णसंधी खास तबलावादकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
या कार्यशाळेत गुरूवर्य पवारसरां सोबत मनमोकळ्या गप्पा, प्रश्नोत्तरे आणि ‘तबला’ या कलेविषयी त्यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि विचार याचा परामर्श घेतला जाईल. सदर कार्यशाळेत तबल्याचे विविध पैलू, शास्त्रोक्त रियाज़ाच्या पद्धती इत्यादी विषयांवर अमूल्य मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित केले जाईल. सदर कार्यशाळा नवोदित तबलावादक, विद्यार्थी तसेच तबल्यामध्ये करिअर करू ईच्छिणाऱ्या सर्वांसाठीच उपयुक्त ठरावी हा ‘म्युझोफ्रिक’चा उद्देश आहे. तसेच स्वतः गुरूवर्य नितीन पवार यांचाही मानस आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठीच खुली असुन या सुवर्णसंधीचा सर्वांनीच लाभ घ्यावा.असे आवाहन अनिरुद्ध भूधर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी +९१ ७७७४० ४८८८०/ ०२५३-४००१७४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.