काय आहेत सीताफळाचे आरोग्यास फायदे 

डॉ. राहुल रमेश चौधरी 

0

डॉ. राहुल रमेश चौधरी 
सर्वांनी सीताफळ,रामफळ असे फळ आवडीने खाल्ली असतीलच.ही फळे खाताना काहींना फार संकट वाटते .संकट हे दोन प्रकारचे वाटते जे आरोग्यासाठी सजग असतात त्यांना कफ होण्याची भीती वाटते तर गमतीचा भाग म्हणजे दुसऱ्या प्रकारचे संकट हे ही फळे खातांना हात भरणे,हात चिकट होणे,तोंड भरणे अश्या बाबतीत वाटते.तर काहींना मात्र या फळाचा गर खावून तो मनसोक्त चघळून तोंडाने बीया उडयवण्यात मजा वाटते.असो गमती जमतीचा भाग सोडला तर ही फळे खाण्यास अतिशय गोड व शरीराला पोषक अशी असतात.आज आपण यातील सीताफळ या फळाविषयी थोडक्यात पाहूयात.

साधारणत: ऑक्टोबर महिन्याच्या काळात ही फळे येण्यास सुरुवात होते.यात पांढरा पिवळसर असा सुगंधी गर असून काळ्या बीया असतात.याचे फळे,पाने ,बी औषधात वापरली जातात.

काय आहेत सीताफळाचे आरोग्यास फायदे जाणून घेऊ या 
१.सीताफळ च्या पानांची चटणी करून कोरडी खरूज यावर बांधल्यास ,हळदीसोबत बांधल्यास उत्तम लाभ मिळतो.
२.सीताफळाचे बी चूर्ण केस धुण्याकरीता वापरतात.याने केस मुलायम राहतात.कोंडा कमी होण्यास मदत होते.
३.सीताफळाची पाने ही विषारी द्रव्ययुक्त असतात,याचा उपयोग चाई करीता उत्तम होतो.या पानांचा रस चाई च्या जागी चोळून लावावा.
४.गळू लवकर पिकण्याकरीता कच्च्या सीताफळाचे पोटीस बांधावे याने उत्तम लाभ होतो.
५.तळपायांची ,तळहाताची आग होत असल्यास सीताफळ खावे .
६.लहान मुलाना सीताफळाचा गर व मध एकत्र करून द्यावे याने पोषण चांगले होते.
७.स्त्रीस अंगावर बाळ दूध पीत असल्यास दूध भरपूर सूटावे याकरीता सीताफळ खाण्यास द्यावे.याने दूध भरपूर सुटते व स्तनपानानंतर येणारा थकवा दूर होतो..
८.उन्हात सतत काम करणारे ,वेल्डिंग करणारे,उष्णते जवळ काम करणारे अश्यांनी सीताफळ खावे याने तहान लागणे,घसा कोरडा पडणे या तक्रारी दूर होतात.
९.पित्ताच्या काळात पित्ताचा त्रास कमी करावयाचा असल्यास अथवा होवूच नये याकरीता सीताफळ खावे.

निषेध
१.सर्दी  खोकला पडसे असलेल्या लोकांना सीताफळ खाणे सर्वथा वर्ज्य आहे
२.सूज येणाऱ्या आजारात सीताफळ खावू नये
३.रिकाम्या पोटी सीताफळ खावू नये.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी
 

मोबाईल -९०९६११५९३०

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.