झी मराठीची पहिली नाट्यप्रस्तुती’हॅम्लेट’पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर

0

मुंबई -कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नाट्यगृह बंद आहेत, त्यामुळे नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांना दर्जेदार नाटकांना मुकावं लागतंय. पण आता प्रतीक्षा संपली आहे, नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत सुरु झालेल्या या प्रवासात झी मराठी आपली पहिली वाहिली नाट्यनिर्मिती इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले विल्यम शेक्सपिअर लिखित नाटक‘हॅम्लेट’हे नाटक वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियरच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर आणत आहे.

हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य झी मराठी या वाहिनीने उचलले आणि ह्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड मिळाला. उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेलं डोळे दिपवणारं भव्य दिव्य सेट त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीसउतरलं.यात हॅम्लेटची प्रमुख भूमिका सुमित राघवन यांनी साकारली आहे तर तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले असे कसलेले दिग्गज यात आहेत.

या वेळी नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, “ कालातीत अशी ओळख असलेले’हॅम्लेट’नाटक साकारावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. रंगमंचावरून आता हे नाटक टेलिव्हिजनच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या घरी पोहोचणार आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणाऱ्या या नाटकाच्या वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियरसाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.”

६० वर्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन’प्रशांत दळवी’यांनी केले आहे, या नाटकाला संगीत दिलं आहे‘राहुल रानडे’यांनी.’हॅम्लेट’नाटकाचा वर्ल्ड टेलीव्हीजन प्रीमियर १० ऑक्टोबर दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.