नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २४१७ तर शहरात १७६९ नवे रुग्ण : ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १४८२७

मागील २४ तासात : जिल्ह्यात १६९१ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ .६५ % 

0

नाशिक  आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २४१७ कोरोना बाधित रुग्ण आढळले.त्यापैकी नाशिक शहरात नव्या रुग्णांची संख्या १७६९ झाली तर जिल्ह्यात आज १६९१ जण कोरोना मुक्त असून आज जिल्ह्यात कोरोनामुळे आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ३५९५जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.

 
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९४.६५ % झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण २ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०२ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १७६९ तर ग्रामीण भागात ४६५ मालेगाव मनपा विभागात ६२ तर बाह्य २१ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.२२ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १४५२७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १०५४२ जण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  – 

नाशिक शहरात ९४.२२ %, नाशिक ग्रामीण मधे ९५.१९ %, मालेगाव मध्ये ९५.०० % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.२५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.६५ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-२

नाशिक महानगरपालिका- ०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-००

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८७७५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ४०३७

सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण 

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – २६

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०७९१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १६

४) मालेगाव मनपा रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३०६


५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३६८८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ३५९५
 
आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण 
 
लक्षणे असलेले रुग्ण  – १४४५
 
लक्षणे नसलेले रुग्ण – १३३८२
 
ऑक्सिजन वरील रुग्ण  – १३२
 
व्हेंटिलेटर वरील रुग्ण  – २३

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.