मालेगावच्या २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध, पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच - छगन भुजबळ

0

मुंबई – मालेगावच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध असून मालेगाव शहरातील येणाऱ्या निवडणुकीत महापौर हा राष्ट्रवादीचाच होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मालेगाव मधील विविध पक्षाच्या तब्बल २८ नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्हाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील राष्ट्रवादी भवन मध्ये मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत  झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, युवकाध्यक्ष मेहबूब शेख,माजी खासदार समीर भुजबळ ,मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख, शिवाजी गर्जे,माजी आमदार शेख रशीद शेख, महापौर ताहेरा शेख,नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना नियमांचे पालन करत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की मालेगाव असेल किंवा नाशिक असेल त्या भागाचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या भागासाठी लागणार निधी तातडीने मंजूर केला जाईल. अल्पसंख्याक समुदायाचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागामार्फत लागणारी सर्व मदत आपणास केली जाईल. आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मालेगाव मध्ये मजबूत होत आहे त्यामुळे पक्ष विस्तारासाठी आणखी जोमाने आपण देखील काम कराल.

नाशिकप्रमाणे भुजबळ साहेब मालेगावचा देखील विकास करतील – अजित पवार 

या कार्यक्रमावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भुजबळ साहेबानी नाशिकचा केलेला विकास काही लपून राहिला नाही त्यामुळे जनतेने या भागात विविध क्षेत्रात विकासकामे पहिली आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मालेगावचा देखील अश्याच पद्धतीने विकास होईल. आणि भुजबळ साहेब आणि आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देखील होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पदाधिकारी यांनी ओळ्खपत्राचे वाटप देखील करण्यात आले.

यावेळी मालेगाव मनपाचे माजी सभागृह नेता अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद, माजी स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, विठ्ठल भिका बर्वे, सलीम अन्वर, नजिर अहमद इरशाद अहमद, मोहम्मद कमरून्नीसा रिजवान, सावंत नंदूकूमार वाल्मीक, सौ. मंगलाबाई धर्मा भारमे, फकीर मोहम्मद शेख सादीक, जैबून्नीसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, हमीदा बी शेख जब्बार, रजिया बेगम अब्दुल मजीद, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, शेख रजिया बी इस्माईल, निहाल अहमद मोहम्मद सुलेमान, फारूक खान फैजूल्ला खान, नुरजहाँ मोहम्मद मुस्तफा, सलीमा बी सैय्यद सलीम, किशवरी अशरफ कुरेशी, यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.