नाशिक मनपाचा आगामी महापौर भाजपचाच होणार – गिरीष पालवे

0

नाशिक –नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीत भाजपाचेच बहुमत येणार असून भाजपने १०० प्लसचा नारा दिला आहे.मागील पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचे बहुमत होते व भाजपाचे ६६ नगरसेवक निवडून आले होते.या पाच वर्षात भाजपने अनेक विकासकामे केली असून त्या विकासकामांच्या बळावरच आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असे भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे यांनी सांगितले.

नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहराचा चौफेर होत असलेला विकास  डोळयासमेार ठेवून नाशिककरांना रस्ते,पाणी,वीज, आरोग्य या मुलभूत गरजांबरोबरच विकासाचे अनेक प्रकल्प राबवून नाशिकचे नाव देशाच्या नकाशावर अग्रभागी आणले आहे.त्यांत प्रामुख्याने नाशिक नाशिक महानगरपालिकेने स्वताची प्रदुषणविरहित सी.एन.जी.सिटी लिंक बस सेवा सुरु केली.या बससेवेला केंद्राचा उत्कृष्ठ पुरस्कार दिल्ली येथे मिळाला.

नाशिक शहरात पाण्याच्या नविन टाक्या,शहराच्या सर्व बाजुंचे रिंगरोड,एल.ई.डी.लाईट,के के वाघ कॉलेज ते आडगांवच्या पुढे उड्डाणपुल निर्मिती,मंजुर झालेले व्दारका ते नाशिकरोड तीन मजली उड्डाणपुल, शहरामधील इतर दोन प्रस्तावित उड्डाणपुल,प्रस्तावित न्युओ मेट्रो, नाशिक शहराच्या सर्व हद्दीपासून पुढे २० कि.मी.पर्यंत सिटी लिंक बस सेवा, नाशिक शहरामधून जाणारा समृध्दी महामार्ग व सुरत ते चेन्नई महामार्ग, प्रस्तावित आय.टी.हबमुळे ३०० एकर क्षेत्र विकसित होणार असून  त्यामुळे नाशिक मनपाच्या उत्पन्नात ५५० ते ६०० कोटींची होणारी वाढ होणार आहे.

भारतातील आयटी हब उभारणारी एकमेव नाशिक महानगर पालिका आहे. उद्योजकांचा एलबीटी प्रश्न सोडविणे,इलेक्ट्रीकल वाहनांकरीता इ.व्ही.चार्जिंग स्टेशन, औद्योगिक क्षेत्रातील फायर स्टेशन बाबतचा निर्णय,सी.इ.पी.टी.प्लॅन, शहरातील सर्व नाल्यांचे समांतर पाईप लाईन टाकून ते घाण पाणी पवित्र गंगा गोदावरीत न जाता शुध्दीकरण प्लॅटव्दारे बाहेर शुध्द करणे,नमामी गंगे प्रकल्पाकरिता केंद्र सरकारकडे सादर केलेल्या रु.१८३० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात करणे, त्यामुळे गंगा गोदावरी नदीचे पावित्र्य जपून पुर्ण गंगा नदी शुध्दीकरण करणे,अंबड व सातपूर औद्यगिक वसाहतींना पुर्ण सहकार्य व मदत करणे अशा एक ना अनेक विकास कामांच्या माध्यमामधून आम्ही येणाऱ्या नाशिक मनपा निवडणूकांना सामोरे जाणार आहेात.असे हि गिरीश पालवे यांनी सांगितले.

शिवसेनेकडे नाशिककरांकरिता प्रचाराकरिता कोणताही मुद्दा नाही.महाविकास आघाडीचे सरकार सर्व आघाडयांवर सपशेल अपयशी ठरले आहे. आताची शिवसेना हि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही.दोन वर्षापेक्षा जास्त काळ  मंत्रालय मुख्यमंत्र्यावीना सुरु आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना डावलून पवार घराण्याची समांतर सत्ता बेधुंद सुरु आहे असे हि पालवे म्हणाले .

राज्यातील सर्व विकासकामे ठप्प झाली असून राज्यातील सर्व सामान्य जनता शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कारभाराला त्रस्त झाली असून त्यांच्या राज्य कारभारावर जनता नाराज आहे. या सर्व बाबीमुळे जनतेचा महाविकास आघाडीवरचा विश्वास उडाला आहे.

याउलट केंद्रातील मोदी सरकार मोफत कोरोना लस पुरवठा,ऑक्सिजन पुरवठा, मोफत अन्नधान्य पुरवठा,वेळोवेळी रस्ते,उड्डाण पुल व इतर सर्व विकास कामांकरिता वेळोवेळी देत असलेला निधी व त्याकरिता माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वेळोवेळी करत असलेला पाठपुरावा यामुळे  जनतेचा मोदी सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर पुर्ण विश्वास वाढला आहे.हे सर्व पहाता आगामी निवडणूकीत आम्ही नाशिक मनपा मध्ये पुन्हा सत्तेत येऊ असे पालवे यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.