नाशिकरोडला भरवस्तीत बिबट्याचा हल्ला : एक जण जखमी 

हल्ल्याचा थरार सी सी टीव्हीत कैद (Video)

0

नाशिक,दि. २४ जुलै २०२३ – नाशिकरोड येथे भरवस्तीत बिबट्या फिरतांना आढळून आल्याने नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

नाशिकरोडच्या गुलमोहर कॉलनीत रविवारी भरवस्तीत दहशद निर्माण केली आहे.मुक्त फिरणाऱ्या बिबट्याने एका पादचाऱ्यांच्या अंगावर मागून अचानक हल्ला करून त्याला जखमी केले आहे. हो घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ हादरून सोडणारा आहे

पादचाऱ्यांच्या आजूबाजूने वाहन जात असतांना अचानक बिबट्याने त्या पादचाऱ्यावर हल्ला चढविला बिबट्याने इतक्या वेगात झडप घातली कि तो पादचारी खाली कोसळला .गेल्या काही दिवसापासून या बिबट्याचा आनंद नगर सह गुलमोहोर कॉलनीत मुक्त संचार दिसून येत असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पादचाऱ्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!