बबनराव घोलप देणार ठाकरे गटाला धक्का ? उप नेतेपदाचा दिला राजीनामा 

0

नाशिक,दि.१० जून २०२३ – शिर्डी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असणाऱ्या माजीमंत्री बबनराव घोलप ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले माजीमंत्री बबनराव घोलप यांनी आता उप नेतेपदाचा ही राजीनामा दिला आहे. या बाबत जनस्थानशी बोलतांना घोलप म्हणाले मी उप नेतेपदाचा जरी राजीनामा दिला असला तरी अद्याप मी शिवसेनेत आहे परंतु येत्या एक दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ सर्वाना विचारात घेऊनच योग्य निर्णय घेणार असल्याचे घोलप यांनी सांगितले

शिर्डी लोकसभा मतदार संघात एकीकडे भानुदास वाकचौरे हे पुन्हा ठाकरे गटात सहभागी झाले असतानाच घोलप हे शिर्डी मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, त्यातच उद्धव ठाकरे यांनी घोलप यांना संपर्क प्रमुख पदावरून हटऊन त्यांच्या जागी दुसरा संपर्क प्रमुख नियुक्त केला, त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रारंभी फारसा फरक पडला नाही, मात्र त्यानंतर खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आमदार नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले, आता बबन राव घोलप काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!