आजचे राशिभविष्य बुधवार,२० डिसेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी.हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे” *दुर्गाष्टमी/बुधाष्टमी*
नक्षत्र – उत्तरा भद्रपदा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी चंद्र आहे. महत्वाचे करार आज नकोत. प्रवासात त्रास संभवतो. शिक्षणात अडथळे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. प्रगतीचा आलेख उंचावेल. खर्चात मात्र वाढ होऊ शकते.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीत स्पर्धेचा त्रास जाणवेल. सहकारी विनाकारण अडचणी निर्माण करू शकतात.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अधिकाराचा योग्य वापर करा. प्रवास टाळा. आप्त/ नातेवाईकांची चिंता वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. शेअर्स मधून नुकसान संभवते. इष्ट देवतेची उपासना करा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनोळखी इसमापासून त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. पाळीव पशूंपासून सावध रहा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक लाभ होतच आहेत. मागील प्रमाणे कामे चालू ठेवा. लेखन करताना काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम वक्तृत्व ही तुम्हाला देणगी आहे. त्याचा योग्य वापर करा. शेती व्यवहारात यश मिळेल. शेअर्स मधून नुकसान संभवते.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामातील सातत्य हा तुमचा गुणधर्म आहे. त्याचा या काळात उपयोग होईल. घराचे स्वप्न साकार होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रगतीची घोडदौड चालू आहे. खर्चात वाढ होईल. मात्र श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटे प्रवास घडतील. उधारीचा त्रास होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या स्वतःच्या राशीत चंद्र आहे. काही आनंद देणाऱ्या घटना घडतील. सासूबाईंची सेवा करावी लागेल.

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!