आजचे राशिभविष्य बुधवार,१७ एप्रिल २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र शुक्ल नवमी. वसंत ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज चांगला दिवस आहे” *श्रीराम नवमी* देवीला दवणा वहाणे. 
नक्षत्र – अश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्राचा बुद्ध आणि शुक्राशी शुभ योग आहे. अचानक एखादी सुखद घटना घडेल. मात्र हातून एखादे चुकीचे काम होऊ शकते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्साह वाढवणारा दिवस आहे. नवीन खरेदी होईल. वाहन सुख लाभेल. अधार्मिक कर्मे होऊ देऊ नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कामाचा वेग वाढेल. मनासारखी कामे पार पडतील. गुरू आणि हर्षल थोडेफार सहकार्य करतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मूळ उत्साह वाढेल. प्रवास घडतील. त्यासाठी कार्यालयीन कामकाजासाठी फाटा द्याल. मौज कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. धार्मिक बाबतीत जागृत रहा. फसवणूक होऊ देऊ नका.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पत्नीसाठी वेळ द्याल. मौल्यवान खरेदी कराल. स्त्रीधन सांभाळा. चोरीचे भय आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाचा पसारा वाढेल. व्यावसायिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. मात्र जोडीदार काहीसा नाराज राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भाग्य उजळेल. जेष्ठची मदत मिळेल. शिक्षणात लाभ होतील. आरोग्य मात्र सांभाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारसा अनुकूल दिवस नाही. जुनी अडलेली कामे मार्गी लागतील. मेहनत वाढवावी लागेल. संतती कडून निराश होऊ शकते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खरेदी होईल. प्रिय व्यक्ती भेटेल. मित्र मंडळींची गाठ पडेल. गृहकलह टाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानात चंद्र आहे. जपून कामे करा. आर्थिक लाभ वाढतील. मेजवानी मिळेल. अति धाडस नको.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनाचा आनंद हाच खरा आनंद  याचा प्रत्यय आज येईल. भ्रमंती घडेल. मौज कराल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!