आजचे राशिभविष्य मंगळवार,१७ सप्टेंबर २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे”*अनंत चतुर्दशी, प्रोष्ठपदी पौर्णिमा* 
नक्षत्र – शततारका/ पू. भा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ. बाळाची योग आणि विष्टी करण शांती करून घेणे)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभ स्थानी चंद्र आहे. कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. कुटुंबातील शांती सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढेल. अधिकारात वाढ होईल. देणी द्यावीच लागतील. कर्जे मंजूर होण्यास विलंब लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास घडतील. नियोजन बदलेल. कामे पूर्ण होतील. सिद्धी प्राप्त होतील. उच्च शिक्षण लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  सांभाळून पावले उचला. जुने येणे वसूल होईल.  धन- संपत्ती वाढेल. नवीन करार होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. शत्रू पराभूत होतील. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. कोर्ट कामात यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. व्यापार वाढेल. नवीन संधी चालून येतील. वाहन/ मोबाईल दुरुस्ती करावी लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लक्ष्मी प्रसन्न होईल. सिद्धी प्राप्त होतील. छोटे प्रवास घडतील. संशोधन कार्यात यश मिळेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ चंद्र सामाजिक कामात अडकवून ठेवेल. जमीन व्यवहार होतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अर्थकारण मजबूत होईल. व्यापारात वृद्धी होईल. चांगला दिवस आहे. छोटे प्रवास घडतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक सौख्य लाभेल. नविन खरेदी होईल. देणी द्याल. संततीची नाराजी दूर करावी लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. नातेवाईक येतील. गूढ उलगडतील. संवाद झाल्यास वाद मिटतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानात मंगळ आणि राहुच्या नक्षत्रात चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. विनाकारण अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.