आजचे राशिभविष्य सोमवार,१४ ऑक्टोबर २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल एकादशी/द्वादशी. शरद ऋतू. 
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज क्षय तिथी आहे.” *भागवत एकादशी*
चंद्र नक्षत्र – शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. (विष्टी करण शांती करून घेणे) 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 

मेष:- सूर्याचा मंगळाशी केंद्र योग आहे. अति धाडस नको. प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

वृषभ:–  सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा. कामाचा जोर वाढेल.

मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे.  पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.

कर्क:– अनुकूलता नाही. अष्टम स्थानी चंद्र – शनी युती आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. प्रेमात अपयश संभवते.

सिंह:-  आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. वादविवाद टाळा. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

कन्या:– आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा.

तुळ:– पंचम स्थानी चंद्र आहे.  सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. संतती बाबत चांगली बातमी समजेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको.

वृश्चिक:– मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. जमिनीची कामे मात्र लांबणीवर पडतील.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. चैन कराल.

मकर:-संमिश्र कालावधी आहे. आध्यात्मिक लाभ होतील. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.

कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. आत्ममग्न व्हाल. नवीन मार्ग सापडतील.

मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र देणी द्यावीच लागतील. दानधर्म करावा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.