नवी दिल्ली ,दि, – २९ मे २०२५ – Operation Shield Mock Drill भारत सरकारने “ऑपरेशन शील्ड” अंतर्गत गुजरात, पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित जम्मू-कश्मीरमध्ये नियोजित नागरिक संरक्षण मॉक ड्रिल (Civil Defence Mock Drill) तात्पुरती स्थगित केली आहे. २९ मे २०२५ रोजी ही ड्रिल पार पडणार होती, परंतु ती आता पुढे ढकलण्यात आली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
🔥 पार्श्वभूमी – भारत-पाक संघर्ष आणि सुरक्षेचा उच्च सतर्कता स्तर:(Operation Shield Mock Drill)
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतीय सीमांवर ३०० ते ४०० ड्रोन पाठवून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने हे ड्रोन प्रभावीपणे निष्प्रभ केले.
या हल्ल्यांमुळे जम्मू-कश्मीर, पंजाब, आणि राजस्थानमधील सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआउट आणि सायरन वाजवण्याचे प्रसंग घडले. त्यानंतर भारताच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
🕊️ सीजफायरनंतर ऑपरेशन स्थगित:
भारताच्या निर्णायक कारवाईनंतर, सीमा संघर्षविराम (Ceasefire) जाहीर करण्यात आला.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या मिसाईल हल्ल्याची कबुली दिली.
“९ व १० मेच्या रात्री, भारताने नूर खान एअरबेस वर मिसाईल हल्ला केला होता,” असे त्यांनी “यौम-ए-तशाकुर” या समारंभात सांगितले.
🚨 ऑपरेशन शील्ड काय आहे?
गृह मंत्रालयाने देशभरात २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलचे आदेश दिले होते.
यात ब्लॅकआउट एक्सरसाइज, हवाई हल्ला सायरन, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती सत्र समाविष्ट होते.
नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देणे हा उद्देश होता.
📢 सुरक्षा यंत्रणा सज्ज, पण नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे.