✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक (Marathi Horoscope Today)
📞 कुंडली सल्ला: 8087520521
🗓️ ज्येष्ठ शुक्ल नवमी | उत्तरा फाल्गुनी नक्षत्र | वज्र योग | सिंह/कन्या राशीचे बाळ जन्मेल
🕐 राहुकाळ – दुपारी १२.०० ते १.३०
✨ “आजचा मंत्र – संयम ठेवा, संधी साधा” ✨(Marathi Horoscope Today)
🟠आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/ कन्या. (वज्र योग् शांती)
🔴 मेष (Aries)
आर्थिक लाभाची संधी आहे, परंतु तणाव आणि मानहानीचा धोका आहे. आज बोलताना संयम ठेवा.
टीप: नातेसंबंधात पारदर्शकता ठेवा.
🧿 टीप: दक्षिणेला प्रवास टाळा.
🟢 वृषभ (Taurus)
घरगुती खरेदीसाठी चांगला दिवस आहे. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा मिळेल.
टीप: नवे व्यवहार आज नको, निर्णय उद्यावर ढकला.
🍀 टीप: हळदीचा टिळा लावा.
🟠 मिथुन (Gemini)
चिडचिड होऊ शकते. घरगुती तणाव वाढू शकतो.
टीप: मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा.
💡 टीप: पाण्याचा दान करा.
🔵 कर्क (Cancer)
व्यवसायात लाभ, पण जमीन व्यवहार टाळा.
टीप: कागदपत्रे नीट तपासा.
🌱 टीप: दूध दान करा.
🟣 सिंह (Leo)
नेतृत्व गुण उजळतील. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये.
टीप: मद्य व अन्य व्यसने टाळा.
🔥 टीप: सकाळी सूर्यनमस्कार घ्या.
🟤 कन्या (Virgo)
संपत्तीच्या वादात अडकू शकता. मात्र व्यावसायिक यश मिळेल.
टीप: बोलताना सावध राहा.
💫 टीप: तुळशीपान खा.
⚪ तुळ (Libra)
शुभ दिवस. परंतु चूक झाली तर ती भविष्यात त्रासदायक ठरू शकते.
टीप: मित्रांशी मतभेद टाळा.
🎯 टीप: संध्याकाळी मीठयुक्त पाणी घरात शिंपडा.
⚫ वृश्चिक (Scorpio)
लाभयोग आहे. चंद्र लाभ स्थानात आहे.
टीप: जुना वैरी आज मित्र बनू शकतो!
💖 टीप: गुलाबपाणी नाकाजवळ लावा.
🔶 धनु (Sagittarius)
कामात यश, सहकाऱ्यांची साथ मिळेल. पण अफवांपासून सावध.
टीप: कुणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका.
🎓 टीप: पिवळा रंग वापरा.
🔷 मकर (Capricorn)
प्रवास व खर्च वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
टीप: साधे राहा, शांत राहा.
🪔 टीप: आकाशदिवा लावा.
🟩 कुंभ (Aquarius)
ऊर्जा कमी वाटेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
टीप: संततीसाठी नियोजन करा.
🌼 टीप: फुलांचा सुगंध जवळ ठेवा.
🟪 मीन (Pisces)
व्यवसायात प्रगती, चांगला काळ सुरू आहे.
टीप: ओळखीच्या बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका.
🔮 टीप: जल अर्पण करा.
४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये-
तुमच्यावर हर्षल, शुक्र आणि बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. अनेकदा तुमच्या वागण्यात विरोधाभास जाणवतो. तुम्हाला अनेक विलक्षण आणि अनपेक्षित घटनांचा अनुभव येतो त्यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे, तुमच्यामध्ये व्यापारी वृत्ती आणि तल्लख पण आहे. तुमची विचारसरणी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध आहे. तुमच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. हातात घेतलेल्या कार्यात तुम्ही पूर्वनियोजन करून उत्तम यश मिळवतात. तुम्हाला नाविन्याची आणि प्रवासाची आवड आहे. रूढी, परंपरा तुम्हाला फारसे आवडत नाहीत. आपल्या आयुष्यात सतत बदल असावा असं तुम्हाला वाटत राहते त्यामुळे तुमचे घर, नोकरी आणि मित्रपरिवार देखील बदलत राहतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या वागण्या मध्ये एक ठामपणा आहे. तुम्हाला तुमच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात.
व्यवसाय:जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र, इंटरियर डिझाईन, बँकिंग, आयात-निर्यात, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कान नाक डोळे तज्ञ, संशोधन.
शुभ दिवस:सोमवार, शुक्रवार, रविवार.
शुभ रंग:जांभळा.
शुभ रत्न:पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🌟 नोट: तुमचे खरे राशीभविष्य जाणून घ्यायचे असल्यास “कुंडली” तपासणे आवश्यक. नावावरून राशी अंदाजे असतात. अधिक माहितीसाठी संपर्क करा.
📱 ज्योतिष सल्ला – 8087520521
📘 FB Page: राशीभाव (Rashibhav)

[…] वो): आज व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत. अचानक लाभ व अपेक्षित सहकार्य मिळेल. 📝 टिप: […]