मुंबई/कोची, दि. ९ जून २०२५ – Cargoship fire Arabian Sea कोलंबोहून न्हावा शेवा (मुंबई) कडे येणाऱ्या सिंगापूरच्या ‘MV WAN HAI 503’ या मालवाहू जहाजाला भर अरबी सागरात आग लागली. या भीषण दुर्घटनेत ५ क्रू मेंबर्स जखमी, ४ जण बेपत्ता, तर १८ जणांना भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने वाचवण्यात यश आलं आहे.
🔥 दुर्घटनेचा तपशील:
स्थान: कोचीपासून ३१५ किमी अंतरावर (४० नॉटिकल माइल)
वेळ: सोमवार, ९ जूनच्या पहाटे
जहाजाचं नाव: MV WAN HAI 503
ध्वज: सिंगापूर
लांबी: 270 मीटर | रुंदी: 12.5 मीटर
कुल क्रू मेंबर्स: २२
बचावले गेले: १८
बेपत्ता: ४
जखमी: ५
💥 काय घडलं नेमकं?( Cargoship fire Arabian Sea)
अगोदर जहाजाच्या अंडरडेकमध्ये आग लागली, आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. हेलिकॉप्टरद्वारे टिपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्फोटामुळे २० कंटेनर्स थेट समुद्रात कोसळले, यामध्ये धोकादायक रसायनं असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
🛡️ भारतीय नौदल व तटरक्षक दलाचे प्रयत्न:
तत्काळ बचाव मोहीम हाती घेण्यात आली.
हेलिकॉप्टर्स व जहाजं रवाना केली गेली.
अग्निशमन आणि शोध कार्य सुरू आहे.
जहाजाचं संरचना मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त, पण सध्या डुबण्याची स्थिती नाही.
At around 0930 hrs today, the Indian Coast Guard received a distress alert from the Singapore-flagged container vessel Wan Hai 503, regarding an explosion and subsequent fire onboard one of the containers, 88 Nautical miles from the coast of Beypore. The vessel had departed the… https://t.co/CgK0mYslwJ
— ANI (@ANI) June 9, 2025
🏥 केरळ सरकारची तयारी:
KSDMA ने जिल्हाधिकाऱ्यांना तयारीसाठी सूचना दिल्या.
स्थानिक रुग्णालये अलर्ट मोडवर.
किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा.
🌊 पर्यावरणीय धोका वाढला:
अरबी समुद्रात पडलेले कंटेनर पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात.
अरबी समुद्री जीवन आणि किनारपट्टीवरील परिसंस्था धोक्यात.
🗣️ ताजे अपडेट मिळत आहेत…
भारतीय नौदल व तटरक्षक दल शिल्लक ४ बेपत्ता सदस्यांचा शोध घेत आहेत.
आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू.