अजिंठा–एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये ‘मॅगझिन’ची अधिकृत निवड
नाशिकच्या मराठी चित्रपटाचा जागतिक मंचावर गौरव


छत्रपती संभाजीनगर -दि,३० जानेवारी २०२६ – Marathi Film Magazine AIFFअजिंठा–एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Ajintha–Ellora International Film Festival – AIFF) 2026 मध्ये विविध भारतीय भाषांतील दर्जेदार चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मराठी श्रेणीतून नाशिकचा ‘मॅगझिन’ हा एकमेव चित्रपट निवडला गेल्याने मराठी सिनेसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि कथा यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. तमिळ, कन्नड, मल्याळम, आसामी, तुलू, हिमाचली, हिंदी अशा अनेक भाषांतील चित्रपट AIFF 2026 च्या अधिकृत निवडीत स्थान मिळवून आहेत.
AIFF 2026 साठी अधिकृत निवड झालेले चित्रपट (Marathi Film Magazine AIFF)
बॅड गर्ल (तमिळ)
परैया (कन्नड)
चिंगम (हिमाचली/हिंदी)
सीक्रेट ऑफ अ माउंटन सर्पेंट (हिंदी)
इंबू (तुलू)
सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज (हिंदी)
खिडकी गाव (मल्याळम)
याकासीक ओमेदे (आसामी)
मॅगझिन (मराठी) ⭐
‘मॅगझिन’ – शांत पण गमतीदार आठवणींची गोष्ट
मराठी चित्रपट ‘मॅगझिन’ हा नाशिकच्या अपर्णा कुलकर्णी यांनी निर्मित केला असून, शुभम संजय शेवडे यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
“बालपणीच्या पहिल्या पानापासून ते शहाणपणाच्या पहिल्या पानापर्यंत दडलेल्या शांत पण गमतीदार आठवणी” या भावविश्वावर आधारित ही कथा साधेपणा, संवेदनशीलता आणि स्मृतींच्या ओलाव्याने प्रेक्षकांना जोडून घेते.AIFF 2026 मध्ये मराठी श्रेणीतून एकमेव निवड मिळाल्याने ‘मॅगझिन’ने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.
प्रदर्शनाची माहिती
हा चित्रपट PVR INOX, संभाजीनगर – स्क्रीन 2 येथे
31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता
1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता
प्रदर्शित होणार आहे.
भारतीय सिनेविश्वातील वैविध्य, कथा आणि संस्कृतींचा उत्सव साजरा करणारा AIFF 2026 हा सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरणार असून, मराठी मुलाने तयार केलेला ‘मॅगझिन’ चित्रपट नक्की पाहावा, असे आवाहन आयोजक आणि चित्रपटसृष्टीतील जाणकारांकडून करण्यात येत आहे.

