नाशिकच्या तन्वी देवरेनी जिद्दीचा महासागर जिंकला! जिब्राल्टर सामुद्रधुनी यशस्वीपणे पोहून ओलांडली

४.५ तासांत १७ किमीचा पराक्रम; ‘ओशियन्स सेवन’ मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण,आयर्नमॅन मिलिंद सोमन, दीपिका राणा आणि श्रेयस होसुर यांनी ही जिब्राल्टरची सामुद्रधुनी यशस्वीपणे पोहून ओलांडली

0

मोरोक्को, ३ मे २०२६ : Gibraltar Strait Swim India नाशिकच्या मॅरेथॉन जलतरणपटू तन्वी चव्हाण देवरे हिने जिब्राल्टरची सामुद्रधुनी यशस्वीपणे पोहून पार करत आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात मोठी कामगिरी नोंदवली आहे. युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांना जोडणाऱ्या या आव्हानात्मक जलमार्गावर विजय मिळवत तिने आपल्या “Oceans Seven” मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे.

स्पेनमधील टॅरिफा येथून भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता तन्वीने आपल्या सोलो स्विमची सुरुवात केली. प्रचंड वेगाने वाहणारे लेव्हांटे (‘Levante’ )वारे, सुमारे १६ अंश सेल्सिअस इतके थंड पाणी आणि अनिश्चित प्रवाह अशा कठीण परिस्थितीतही तिने अवघ्या ४.५ तासांत सुमारे १७ किलोमीटरचे अंतर पार करून मोरोक्कोच्या किनाऱ्याला स्पर्श केला.

Gibraltar Strait Swim India,Tanvi Deore from Nashik conquered the ocean of stubbornness! She successfully swam across the Strait of Gibraltar

या संपूर्ण प्रवासात ‘Columba’ नावाच्या सहाय्यक नौकेने तिची सुरक्षितता आणि मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळली. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या प्रवाहांमुळे अनेक अनुभवी जलतरणपटूंना मोठे आव्हान निर्माण होते. मात्र तन्वीने अतुलनीय जिद्द आणि शारीरिक क्षमता दाखवत हे आव्हान समर्थपणे पेलले.

२०२४ मध्ये इंग्लिश खाडी पार केल्यानंतर तन्वीने सातही महासागरीय आव्हाने पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने “Oceans Seven” मोहिमेला सुरुवात केली होती. जिब्राल्टर सामुद्रधुनी (Gibraltar Strait Swim India) पार करत तिने या मोहिमेत भक्कम पाऊल टाकले आहे. अनेक खंडांतील कठीण जलमार्ग पार करणाऱ्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला आहे.

दोन जुळ्या मुलांची आई आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत तन्वीने मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे. तिच्या या पराक्रमामुळे नाशिकसह संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला असून, तरुण खेळाडूंना नव्या ध्येयांसाठी प्रेरणा मिळाली आहे.आयर्नमॅन मिलिंद सोमन, दीपिका राणा आणि श्रेयस होसुर यांनी ही जिब्राल्टरची सामुद्रधुनी यशस्वीपणे पोहून ओलांडली

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!