मुलांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख देणाऱ्या अनोख्या कार्यशाळेचे नाशिकमध्ये आयोजन
शा गो गो ना – शब्दातून गोष्ट, गोष्टीतून नाटक

नाशिक, दि. ६ मे २०२६ –Drama Workshop in Nashik उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की सहली, खेळ आणि विविध शिबिरांची लगबग सुरू होते. पण यंदा नाशिकमध्ये मुलांसाठी काहीतरी वेगळं, अर्थपूर्ण आणि सर्जनशील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे – “शा गो गो ना – शब्दातून गोष्ट, गोष्टीतून नाटक” ही खास नाट्य कार्यशाळा नाशिकमध्ये होणार आहे.’श गो गो ना’ या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन नाशिक मधील एका सर्जनशील व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस दास्तांगो स्टुडिओजने केले आहे. दास्तांगो म्हणजे स्टोरीटेलींग, आणि या शिबीराच्या माध्यमातून मुलांना गोष्टींच्या जगाची सहल करून आणणार आहेत.
ही कार्यशाळा केवळ अभिनय शिकवणारी नाही, तर ती एक सर्जनशील प्रवास आहे. इथे मुलांना शब्दांपासून गोष्ट कशी जन्म घेते आणि त्या गोष्टीतून रंगमंचावर नाटक कसं उभं राहतं, याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. कथाकथन, अभिनय, वाचन आणि अभिव्यक्ती या सगळ्यांचा सुंदर संगम या कार्यशाळेत पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला या कार्यशाळेत पाठवावे असे अभिनव उपक्रम या कार्यशाळेत होणार आहेत.
या उपक्रमाचे नेतृत्व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या चिन्मय केळकर यांच्याकडे आहे. लायब्ररी शिक्षक, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या सर्व भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या चिन्मय यांचा मुलांशी संवाद साधण्याचा खास अंदाज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना केवळ अभिनयच नाही, तर विचार करण्याची, निरीक्षण करण्याची आणि स्वतःची कथा घडवण्याची प्रेरणा मिळणार आहे.
आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईल, टीव्ही आणि स्क्रीनमध्ये जास्त गुंतलेली दिसतात. अशा वेळी “शा गो गो ना” सारखी कार्यशाळा त्यांना पुस्तकांच्या, कथांच्या आणि सर्जनशीलतेच्या जगात पुन्हा नेण्याचा एक सुंदर प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे. ही कार्यशाळा मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, टीमवर्क आणि संवाद कौशल्य विकसित करण्यावर भर देणार आहे.
विशेष म्हणजे, या कार्यशाळेत मुलं स्वतः कथा तयार करतात, त्या कथांचा अर्थ लावतात आणि शेवटी त्याचं नाट्यरूपांतर करून सादरीकरण करतात. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया केवळ सैद्धांतिक न राहता अनुभवाधारित बनते. ही प्रक्रिया मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार जाणकारांनी व्यक्त केले.
कार्यशाळेचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:(Drama Workshop in Nashik )
तारीख: २१ मे ते ३० मे २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ४:००
स्थळ: दास्तांगो स्टुडिओ, तिसरा मजला, धनश्री एम्पायर, पाइपलाइन रोड, नाशिक
वयोगट: ८ ते १४ वर्षे
पालकांसाठीही ही एक उत्तम संधी आहे. कारण या कार्यशाळेनंतर मुलं जर मोबाईलऐवजी पुस्तकांची मागणी करू लागली, तर तेच या उपक्रमाचं खऱ्या अर्थाने यश ठरेल.उन्हाळ्याच्या सुट्टीला केवळ विरंगुळा न बनवता ती शिकण्याची, व्यक्त होण्याची आणि सर्जनशीलतेची संधी बनवायची असेल, तर “शा गो गो ना” ही कार्यशाळा नक्कीच योग्य पर्याय आहे.
नोंदणीसाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा: ९४२२७४७७५८ (व्हॉट्सॲप)


