आजचे राशिभविष्य सोमवार, २५ मे २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ शुक्ल दशमी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र – उत्तरा (फाल्गुना).
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह / सकाळी ९.०७ नंतर कन्या. (वज्र योग)
✨ आज शुभ दिवस आहे.
रवी त्रिकोण चंद्र, रवी लाभ नेपच्यून, चंद्र लाभ गुरू, चंद्र त्रिकोण हर्षल, चंद्र प्रतियुती नेपच्यून.

🪔 राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ संभवतात.

वृषभ:- दिवस संमिश्र आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. नातेवाईकांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन:- आजचा दिवस लाभदायक आहे. व्यापारात वाढ होईल. नवीन ओळखी उपयोगी पडतील. लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत.

कर्क:- उद्योग व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मालमत्ता आणि वाहनासंबंधी निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

सिंह:- चंद्र राशीतील बदलामुळे मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. कला आणि राजकारण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ संभवतात. आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या:- सकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

तुळ:- काही महत्वाच्या व्यक्तींची भेट होईल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात आनंद राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मात्र अति भावनिक होणे टाळा.

वृश्चिक:- आज शत्रूंवर मात कराल. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कोर्ट-कचेरीच्या कामात अनुकूलता राहील. गुप्त लाभ संभवतात.

धनु:- उत्तम दिवस आहे. भाग्योदयाचे संकेत मिळतील. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. प्रवासातून लाभ होतील. संततीसुख लाभेल.

मकर:- कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयमाने वागा. मालमत्तेसंबंधी कामे पुढे सरकतील. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी येईल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ:- पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. लेखन, पत्रकारिता आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रगती मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभदायक राहील.

मीन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. द्रव्यार्जन वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुनी येणी वसूल होतील. मात्र भावनिक निर्णय घेणे टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!