आजचे राशिभविष्य शनिवार, ६ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण षष्ठी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे.”
🌙 नक्षत्र – श्रवण / सकाळी ६.०३ नंतर धनिष्ठा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर / संध्याकाळी ७.०४ नंतर कुंभ. (सकाळी १०.०५ पर्यंत एइंद्र योग)

🪔 राशिभविष्य – (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक दिवस आहे. सकाळच्या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. संध्याकाळनंतर अनावश्यक वाद टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संयमाने वागल्यास लाभ मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षार्थींना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील. गुप्त लाभाची शक्यता आहे. संयम ठेवा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. नवीन संबंध प्रस्थापित होतील. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी राहील. आर्थिक लाभ संभवतात.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित कामातून लाभ मिळेल.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) घरगुती वातावरणात काही बदल जाणवतील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. संवाद कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील.

मकर:– (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. सकाळी महत्त्वाची कामे पूर्ण करा. संध्याकाळनंतर चंद्र राशी बदलल्याने खर्च वाढू शकतो. आर्थिक नियोजन आवश्यक राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) संध्याकाळनंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह वाढेल. नवीन योजना आखाल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. मानसिक आनंद मिळेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तीकडून शुभवार्ता मिळू शकते. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक राहील.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!